Tiger Love Story : मुके प्राणी आणि त्याचे जग हे निराळेच असते. आणि प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये प्रेम हि भावना अगदी सारखीच असते. आणि हि प्रेम भावना सतत्याने पाहायला देखील मिळते. असेच प्रेमाचे वारे वाहत आहे ते महाष्ट्राच्या जंगलात. महाराष्ट्रातील एका वाघाने आपले प्रेम मिळवण्यासाठी थेट तेलंगणा गाठले असल्याचे समोर आले. या वाघाने आपल्या प्रेमाच्या शोधात तब्बल ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास पार केला.
वन्यजीव विभागाच्या ट्रॅकिंग यंत्रणांमुळे त्याच्या हालचालींचं निरीक्षण करणं अगदी सोपं झालं आहे. या प्रवासादरम्यान त्याने अनेक नद्या पार केल्या, घनदाट जंगलं ओलांडली. अखेर आता तो थेट तेलंगणातील मंचेरियल जंगलात येऊन पोहोचला. सध्या वाघांच्या प्रजनन हंगामाची सुरुवात झाली आहे.

तेलंगणातील आदिलाबाद परिसरातील जंगलांमध्ये या वाघाने आपल्या अद्भुत सफरीने सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले आहे. या वाघाने महाराष्ट्रातील प्राणहिता नदीवरून मोठी उडी घेतली आणि कागजनगर वन विभागाच्या वाघांच्या कॉरिडॉर क्षेत्रात थेट प्रवेश केला आहे, त्याच्या प्रेमाखातर त्याने इतक्या मैलांचं प्रवास केला.
स्थानिक वनविभाग अधिकारी सुशांत सुक्तेव यांनी या संधर्भात माध्यमांना माहिती दिली ते सांगतात , “वाघ प्रजनन हंगामात म्हणजे वसंत ऋतूमध्ये जोडीदार, अन्न आणि पाण्याच्या शोधात अनेकदा प्राणहिता नदी पार करताना दिसतात. काही वाघ तिथे थोड्या काळासाठी स्थायिक देखील होतात.
ही फक्त प्रेमसंदर्भातील गोष्ट नाही, तर ही गोष्ट पर्यावरण आणि संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित करणारी अत्यंत सुंदर गोष्ट आहे. कागजनगर परिसर हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून तेलंगणाच्या जंगलांकडे स्थलांतर करणाऱ्या वाघांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या वाघांचा स्थलांतर कॉरिडॉर या प्रजातीच्या मुक्त हालचालींसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि हीच कथा अशा नैसर्गिक मार्गांच्या पर्यावरणीय आणि जैविक श्रेष्ठतत्वावर प्रकाश टाकते. या वाघाने आपल्या प्रेमाच्या शोधाची सफर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्यापासून सुरू केली. सुमारे ४०-५० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर त्याने करजेली रेंजमधील इत्यखाल पहाड जंगलातून तेलंगणात प्रवेश केला आहे.

पण त्याचा प्रवास इथवरच थांबला नाही. हा नर वाघ पुढे कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर कॉरिडॉरपर्यंत चालत राहिला. वनअधिकारी त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्याच्या हालचालींचं निरीक्षण करण्यासाठी अनेक कॅमेरे लावले गेले आहेत. तसेच ग्राउंड पॅट्रोल टीम्स ही सक्रिय असून या टीम्स त्याच्या पावलांचे ठसे आणि प्रवासाचा मार्गाचा बारकाईने अभ्यासत करत आहेत. वाघांचा प्रजनन हंगाम ऑक्टोबरपासून डिसेंबर या काळात असतो. त्यामुळे हा नर वाघ त्याच्या प्रेमात कोणत्या सीमा ओलांडतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.
हे देखील वाचा –
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








