Sanjay Raut : राज्यात राजकीय वर्तुळात काही ना काही हालचाली कायमच चालत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायमच चर्चा रंगलेली असते. आता आजून एक धक्का देणारी बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गंभीर आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात संजय राऊत हे पुनरागमन करतील. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी पहिलाच मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्सवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊतांना प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. या आधीही ते दवाखान्यात गेले होते त्यावरही बरीच चर्चा झाली आणि आता हे पत्रक त्यांनी जाहीर केलं आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहल आहे?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती,
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास दाखवलात आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. यावर उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरात लवकर बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास माझा नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीसन पुन्हा येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच पाठीशी राहू द्या. अस पत्र त्यांनी पोस्ट केलं आहे.
हे देखील वाचा –
Tiger Love Story : महाराष्ट्राच्या वाघाने प्रेमासाठी गाठले तेलंगणा..
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








