Home / महाराष्ट्र / Loan Waiver : महाराष्ट्रात पुढच्या वर्षात तरी शेतकरी कर्जमाफी होणार का?

Loan Waiver : महाराष्ट्रात पुढच्या वर्षात तरी शेतकरी कर्जमाफी होणार का?

Loan Waiver : राज्यात शेतकऱ्यांचा मुद्दा जोरदार वाजताना दिसत आहे. कर्ज माफी वरून राज्यात मोठ्या उलाढाली देखील होताना दिसत आहेत....

By: Team Navakal
Loan Waiver

Loan Waiver : राज्यात शेतकऱ्यांचा मुद्दा जोरदार वाजताना दिसत आहे. कर्ज माफी वरून राज्यात मोठ्या उलाढाली देखील होताना दिसत आहेत. नुकताच गाजत असलेला मुद्दा म्हणजे बच्चू कडूनच आंदोलन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उग्र आंदोलन करणारे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर आता तोडगा निघाल्याचे दृश्य आहे. या आंदोलनाचे फलित म्हणून अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी तारीख देखील बच्चू कडू यांना दिली आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये जबरदस्त अस आंदोलन करून चक्काजाम परिस्थिती निर्माण करणारे बच्चू कडू यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावीच लागली असल्याचे दृश्य आहे.

बच्चू कडू यांची हि प्रमुख मागणी होती कि कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल याची तारीख सरकारला जाहीर करणे गरजेचे. तडकाफडकी किंवा तातडीने कर्जमाफीचा निर्णय घेता येणार नाही याची कल्पना देखील बच्चू कडू आणि इतर शेतकरी आंदोलकांना नक्कीच होती, म्हणूनच सरकारने एखादी विशिष्ट तारीख द्यावी ही त्यांची प्रमुख मागणी होती.

पण सरकारने आता ३० जून ही तारीख देऊन शेतकरी कर्जमाफीचा विषय तात्पुरता का होईना सात-आठ महिने पुढे ढकलला असल्याचे चित्र आहे. पुढील वर्षाची म्हणजेच ३० जून २०२६ ही तारीख मात्र घेतली निर्णय घेतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. शिवाय त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत कायमस्वरूपी सुधार आणण्यासाठी कोणते अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय करता येतील याचा विचार केला जाणार आहे.

म्हणजेच येत्या काही सात ते आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय आणि शिफारसी असतील त्या सुचवल्या जातील. त्याचवेळी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो.

खरेतर गेल्या २० वर्षांच्या कालावधीमध्ये विविध सरकारांनी आप आपल्या कालावधीमध्ये कर्जमाफी देखील केली आहे. पण सातत्याने अशा प्रकारे कर्जमाफी होऊनसुद्धा शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही हे वास्तव अत्यंत कटू आहे.

पंतप्रधान २०१४ मध्ये सर्वप्रथम सत्तेवर आले तेव्हा त्यांनी देशातील बळीराजाचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट केले जाईल अशी घोषणा केली होती. परंतु; ही घोषणा प्रत्यक्षात आली नाही असा रोष देखील व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र सरकारनेसुद्धा आज आणि उद्याच्या खेळात अडकून ३० जून ही तारीख दिली असेल, तर या विषयाला कधीच न्याय मिळणार नाही. खरं तर कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या न्याय हक्कासाठी लढायला कधीच राजकीय पाठबळाची गरज नसते कारण जी मनगट शेतात राबून स्वतःच घर आणि पर्यायाने राज्य चालवतात त्या मनगटांना कोणीही कमी समजू नये. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार या कर्जमुक्तीवर काय उपयोजना काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

अंदोलन करते बच्चू कडू नेमके कोण?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उग्र आंदोलने करून राज्याचे लक्ष वेधून घेणारे बच्चू कडू मूळचे हाडाचे शिवसैनिक आहेत. नेहमी धार्मिक तणावामुळे चर्चेत राहणाऱ्या अचलपूरमधून निवडून यायचे असेल तर कट्टर हिंदुत्वाचा हुंकार फायद्याचा नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ‘प्रहार’ हा स्वतंत्र पक्ष काढला.

कडू यांनी मागच्या सहा महिन्यांत तीन आंदोलने केली. त्यातले गुरुकुंज मोझरीचे आमरण उपोषण हे सर्वात मोठे ठरले. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आकर्षून घेतले आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात गर्दी वाढते आहे. पण नेहमी भाजपच्या प्रभावामुळे चर्चेत राहणारा विदर्भ आता कडूंच्या आंदोलनामुळे तापलेला आहे.


हे देखील वाचा – Ashy Drongo : मुंबईत पहिल्यांदाच दर्शन! ‘राखाडी ड्रोंगो’ या दुर्मिळ पक्ष्याची नोंद

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या