Sanjay Raut : राजकीय वर्तुळात काही ना काही कारणावरून जोरदार चर्चा रंगतच असतात. त्यातच काल संजय राऊतांच्या (Sanjay raut) पोस्टनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांनी या संधर्भात एक्सवर याची माहिती देखील दिल आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची धडाती तोफ नरमलेली पाहायला मिळते. संजय राऊतांच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना काळजी घ्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांनबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
काळजी घे संजय काका,
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 31, 2025
प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस!
आत्ताही तेच होईल, खात्री आहे!@rautsanjay61 https://t.co/NaG9dGdtsT
संजय राऊत हे शिवसेनेतला एक महत्त्वाचा चेहरा आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं असो या सगळ्यांमध्ये त्यांची भूमिका कायमच महत्त्वाची ठरली आहे.
आदित्य ठाकरेंची पोस्ट नेमकी काय?
आदित्य ठाकरे संजय राऊतांना सदिच्छा देतांना म्हणतात “काळजी घे संजय काका,प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे!” अशी भावनिक पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे.
हे देखील वाचा – Sanjay Raut :संजय राऊतांना गंभीर आजाराची लागण; दोन महिने सार्वजनिक जीवनाला ब्रेक..









