Raj Thackeray : महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीनं सदोष मतदार यादीबाबत मुंबईत सत्याचा महामोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाकप, माकप, शेकाप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं मुंबईतील पॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका इथंपर्यंत सत्याचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत प्रभावीपणे आपले विचार मांडले.
राज ठाकरे म्हणतात आजचा मोर्चा हा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा मोर्चा आहे.एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. सगळे बोलत आहेत, कि हे दुबार मतदार आहेत. भाजपचे लोकसुद्धा तेच म्हणतात. शिदेंचे लोक पण तेच म्हणतात दुबार मतदार आहेत. अजित पवारांची लोक देखील म्हणतात दुबार मतदार आहेत. मग निवडणूक घेण्याची घाई नेमकी का? मतदार याद्या ह्या आधी साफ करा, असं राज ठाकरे म्हणाले.
कल्याण ग्रामीण, डोंबिवलीतील मतदारांचं मलबार हिल या ठिकाणी मतदान –
पारदर्शक याद्या केल्यावर यश अपयश हे नक्की कोणाच ते स्पष्ट होईल. सध्या सगळं लपून छपुनच सुरू आहे. साडे चार हजार मतदार आहेत ज्यांनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधील मतदारांनी मलबार हिल मतदार संघात देखील मतदान केलेलं आहे. लाखो लोक मतदानासाठी वापरले गेले आहेत, असा आरोप देखील राज यांनी केला.
१ जुलै २०२५ च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत १७३९४५६ यातील ६२३७० दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची थोडक्यात माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम ६०२३१ ,मुंबई उत्तर पूर्व मध्ये ९२९८३ दुबार मतदार, तर मुंबई उत्तर मध्ये ६३७४० दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ५०५६५ ,दक्षिण मुंबईत ५५२०५ , नाशिक लोकसभा मतदारसंघात ९९६७३ दुबार आणि मावळ १४५६३६ दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.

याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल देखील राज ठाकरेंनी केला आहे. यातून लोकशाही टिकून राहील का असा सवाल त्यांनी केला. आमदार सांगतो २० हजार मतं बाहेरून आणली. नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर हे मतदार नोंदवले गेले. शौचालयात मतदार नोंदवले गेले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट सुरु आहे. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर नीट काम करा. प्रत्येक चेहरा हा नीट समाजाला पाहिजे. दुबार, तिबार तिथे आले तर तिथेच फोडून काढा आणि मग त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं.
हे देखील वाचा –
Mumbai Morcha : मुंबईत सत्याच्या मोर्च्याची लढाई! विरोधकांचा महाएल्गार मोर्चा..









