Mahindra XEV 9S : भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा) आपली इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अधिक मोठी करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने आपली नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही 27 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
या आगामी मॉडेलचे नाव Mahindra XEV 9S असेल, जे महिंद्राच्या प्रीमियम इलेक्ट्रिक मालिकेतील एक महत्त्वपूर्ण मॉडेल ठरणार आहे.
INGLO प्लॅटफॉर्मचा फायदा
XEV 9S ही एसयूव्ही महिंद्राच्या खास INGLO स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार होणारे तिसरे उत्पादन आहे. यापूर्वी BE 6 आणि XEV 9e ही वाहने याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. XEV 9e मॉडेलपेक्षा या एसयूव्हीचा व्हीलबेस मोठा असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मागील सीटच्या प्रवाशांना अधिक आरामदायी जागा मिळेल, मात्र डिझाइनचा गाभा महिंद्राच्या XEV रेंजसारखाच कायम राहील.
डिझाइन आणि इंटिरिअर तपशील
डिझाइनच्या बाबतीत, XEV 9S मध्ये XEV 9e आणि पूर्वी दिसलेल्या XUV700 इलेक्ट्रिक (XEV 7e) प्रोटोटाइपची झलक दिसेल. याच्या पुढील भागात महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे वैशिष्ट्य असलेला ‘बंद पॅनल’ आणि स्टॅक केलेल्या LED हेड लॅम्प्सना जोडणारे LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) मिळण्याची शक्यता आहे.
आतील बाजूस, या 7-सीटर एसयूव्हीमध्ये INGLO प्लॅटफॉर्ममुळे फ्लॅट-फ्लोअर डिझाइन असेल, ज्यामुळे दुसऱ्या पंक्तीच्या सीट स्लाईड करण्याची सोय मिळेल. लक्झरी आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी XEV 9e प्रमाणेच ट्रिपल-स्क्रीन डिस्प्ले सेटअप इंटिरिअरमध्ये कायम ठेवला जाण्याची अपेक्षा आहे.
बॅटरी आणि रेंज
अधिकृत पॉवरट्रेन माहिती अद्याप जाहीर झालेली नसली तरी, XEV 9S मध्ये XEV 9e चेच बॅटरी आणि मोटर पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
- प्रीमियम व्हेरियंट मध्ये 75 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे, जो एकाच चार्जवर 656 किलोमीटरपर्यंतची आकर्षक रेंज देईल.
- बेस व्हेरियंट मध्ये 59 kWh बॅटरी युनिट वापरला जाऊ शकतो, ज्याची रेंज सुमारे 542 km पर्यंत असू शकते.
- अशा दमदार रेंजमुळे XEV 9S तिच्या श्रेणीतील सर्वात लांब पल्ल्याच्या (Long-Range) ईव्हीपैकी एक बनू शकते.









