Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर जिल्ह्यातील पिंपरखेळ येथील रहिवाशी बिबटयाच्या हल्ल्याला वैतागले आहेत. त्यामुळे तिथे बिबट्या विरुद्ध मानव असा संघर्ष पेटला आहे. काही दिवसांपूर्वी या गावातील एका १३ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. यात मुलाचा दुर्देवी अंत झाला आहे. कालसुद्धा एका पाच वर्षांच्या एका चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. बिबट्याचा मानवी वस्तीतील सततचा वावर वाढल्याने आमच्या जीवाला धोका असल्याची भीती स्थानिकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार १३ वर्षीय मुलगा घराजवळील ऊसाच्या शेतात गेला होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उसाच्या शेतातून बाहेर ओढलं. मुलाच्या विव्हळण्याचा आवाज ऐकताच त्याचे आई वडील धावत ऊसाच्या शेतात गेले. त्यावेळी बिबट्या त्यांच्यावरही गुरगुरत होता त्यानंतर कसं बसं त्यांनी मुलाला त्याच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप बराच वेळ झाला होता. यानंतर कालसुद्धा एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या गावकर्यांनी रास्ता रोको केला होता.

यात तातडीची उपाययोजना म्हणून माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली असून या आदेशानंतर शार्प शूटरच्या टीमचं घटनास्थळी पाचारण देखील करण्यात आलं आहे. सध्या परिसरात जवळजवळ २५ पिंजरे आणि दहा ट्रॅप कॅमेरे देखील बसविण्यात आले असून ड्रोनद्वारे टेहळणी आणि जन जागृती करण्याचे कामं वन विभाग सातत्याने करत आहे.
हे देखील वाचा –
Leopard Siren : जुन्नरमध्ये बिबट्या दिसताच आपोआप वाजणार सायरन









