Home / क्रीडा / Indian Heaven Premier League- काश्मीरमधील पहिल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा आयोजक पळाला

Indian Heaven Premier League- काश्मीरमधील पहिल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा आयोजक पळाला

Indian Heaven Premier League- मोठा गाजावाजा करत जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हेवन प्रीमियर लीगचा (Indian Heaven Premier...

By: Team Navakal
Indian Heaven Premier League
Social + WhatsApp CTA

Indian Heaven Premier League- मोठा गाजावाजा करत जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हेवन प्रीमियर लीगचा (Indian Heaven Premier League) टी-20 स्पर्धेचा पार बोजवारा उडाला. ढिसाळ व्यवस्थापन, प्रेक्षकांचा आणि प्रायोजकांचा थंडा प्रतिसाद, सोयी-सुविधांचा अभाव आदि कारणांमुळे अपयशी ठरलेल्या या स्पर्धेचे आयोजक खेळाडूंना हॉटेलमध्ये सोडून बिलही न देता पळून गेले. या गोंधळामुळे परदेशातून बोलावण्यात आलेले काही नामवंत क्रिकेटपटू हॉटेलमध्येच अडकून पडले.


तरुणांच्या सर्वंकष विकासासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था युवा सोसायटी आणि जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयएचपीएलचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ही सर्वात भव्य क्रिकेट स्पर्धा ठरणार असून, या स्पर्धेमुळे काश्मीरमध्ये क्रिकेट खोलवर रूजणार, असे दावे आयोजकांनी केले होते.


श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला 25-30 हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभेल, असा दावा विभागीय आयुक्त अंशूल गर्ग यांनी केला होता. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील 32 नामवंत क्रिकेटपटूंना  निमंत्रित करण्यात आले होते. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा रिचर्ड लेव्ही ओमानचा अयान खान आदिंचा त्यामध्ये समावेश होता. मात्र प्रत्यक्षात गेल काही सामने  खेळला. या सामन्यांनाही प्रेक्षकांची म्हणावी तशी उपस्थिती लाभली नाही. रिकाम्या प्रेक्षक गॅलरी, प्रायोजकांचा अभाव आणि हॉटेलचे बिलही आयोजकांनी थकवल्याने संपूर्ण स्पर्धाच अपयशी ठरली.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले

डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांचे राज्यव्यापी आंदोलन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या