Home / महाराष्ट्र / Ashish Shelar :ठाकरेंचा व्होट जिहाद! हिंदू दुबार शोधले!मुस्लिमांना सूट! आशिष शेलारांचा हल्लाबोल!

Ashish Shelar :ठाकरेंचा व्होट जिहाद! हिंदू दुबार शोधले!मुस्लिमांना सूट! आशिष शेलारांचा हल्लाबोल!

 Ashish shelar- राज्यातील मतदारयाद्यांतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरून मविआ आणि ठाकरे बंधूंकडून गेले काही दिवस सातत्याने आरोप झाल्यानंतर आज भाजपाने...

By: Team Navakal
raj uddhav ashish shelar
Social + WhatsApp CTA

 Ashish shelar- राज्यातील मतदारयाद्यांतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरून मविआ आणि ठाकरे बंधूंकडून गेले काही दिवस सातत्याने आरोप झाल्यानंतर आज भाजपाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार (Ashish shelar)यांनी आज पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की, मविआ आणि ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसतात. मात्र, राज्यातील मुस्लीम मतदारांकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. हा व्होट जिहाद आहे. शेलारांच्या आरोपानंतर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही, आम्ही केलेले आरोप शेलार यांनी मान्य केले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांना पप्पू ठरवले, असा पलटवार केला.


महाराष्ट्रातील मतचोरीच्या मुद्यावर मविआ आणि मनसे यांनी मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी ‘सत्याचा मोर्चा’ आयोजित केला होता. त्यात पुन्हा एकदा दुबार मतदारांचे पुरावे सादर करून निवडणूक आयोगासह अप्रत्यक्षरित्या भाजपाला लक्ष्य केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी मविआ आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ बेनकाब करण्याचा दावा करणारी पत्रकार परिषद भाजपाने घेतली. या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले की, आम्ही आज मांडत असलेला मुद्दा हे ‘सत्याचा मोर्चा’तील असत्य नाही तर उघड्या डोळ्यांनी दिसणारे सत्य आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर विरोधकांना जोर का झटका धीरे से बसला. आता दिल्लीतील पप्पूपासून गल्लीतील पप्पूपर्यंत सर्वजण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मविआ, उद्धव ठाकरे गट आणि मनसे मतदारयादी, मतदान यंत्रणा आणि निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवून नियोजित फेक नरेटिव्ह बांधणी करत आहे. मविआ आणि मनसे जातीय आणि धार्मिक मतभेद वाढविण्याचे राजकारण करत आहेत. भाजपा सर्वांबाबत न्यायाची भूमिका घेत तुष्टीकरणाच्या विरोधात ठाम आहे. सत्याच्या मोर्चात राज ठाकरे यांनी जे मतदारसंघ सांगितले, त्या कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड-भिवंडीमध्ये त्यांनी तुष्टीकरणाचा कळस केला आहे. त्यांना हिंदी-मराठी-दलित माणूसच दुबार मतदार म्हणून दिसत आहे. तुम्ही या मतदारांना बडवण्याची भाषा करत आहात. उद्धव ठाकरेही भूमिपुत्रांना फटकवण्याची भाषा करत आहेत. भोईर, पाटील या हिंदू व दलित मतदार आणि मुस्लीम दुबार यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी का? मुस्लीम मतदार तुमचा कडवा समर्थक, हे तुम्ही मांडू पाहत आहात का? हा व्होट जिहाद आहे. राज ठाकरे, अजून वेळ गेलेली नाही  तुम्ही या व्होट जिहादचे समर्थक होऊ नका. उद्धव ठाकरे, तुम्ही विचारवापसी करा. आमचे विरोधकच राहा. मात्र भूमिका मांडताना मते मिळवण्यासाठी या थराला जाऊ नका.


मतदारयादीबद्दलच्या भूमिकेबाबत तुम्ही प्रामाणिक असाल तर मविआ आणि मनसे यांना आमची विनंती आहे की, त्यांनी एसआयआरचे समर्थन करावे. केंद्रातएसआयआरला विरोध आणि राज्यात मतचोरीवर बोलायचे अशी दुतोंडी भूमिका घेऊ नका. काँग्रेसला लांगूनचलनाचा रोग लागलेला आहे. पण राज आणि उद्धव  तुमची बोबडी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणत आहात. तुमची भूमिका संशयास्पद आणि खालच्या स्तरावर निवडणुकीत जिंकण्याची आहे.


शेलार यांनी असा आरोप केला की, मविआ, ठाकरे बंधू दुबार मुस्लीम मतदारांच्या माध्यमातून  निवडणूक यंत्रणेवर दबाव टाकून  समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांनी सुरुवातीला उत्तर भारतीय व बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली. हिंदी भाषिक म्हणून त्यांच्यात फूट पाडणारी ही भूमिका होती. त्यांनी जैन-गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलने केली. आता त्यांनी भोईर-पाटील या मराठी, हिंदू, दलितांविरोधात भूमिका घेतली आहे. मुस्लीम, अल्पसंख्याक दुबारांना पांघरुणाखाली ठेवले आहे. या षड्यंत्राने निवडणुका जिंकण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.


त्यानंतर दुबार मतदारांची मोठी यादीच सादर करत शेलार म्हणाले की, राज्यात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजातील तब्बल 16 लाख 84 हजार 256 दुबार मतदार राज्यात आढळले आहेत. केवळ 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केल्यावर 2 लाख 25 हजार 791 दुबार मतदार आढळले आहेत.  कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार 1 हजार 243 मतांनी विजयी झाले. पण तिथे 5,532 दुबार मुस्लीम मतदार आहेत. साकोलीत नाना पटोले 208 मतांनी जिंकले. तिथे 477 दुबार मतदार आढळले आहेत. वांद्रे (पूर्व) मध्ये वरुण सरदेसाई 11,365 मतांनी विजयी झाले. तिथे 13, 313 मुस्लीम-ख्रिश्चन दुबार मतदार नावे आहेत. संदीप क्षीरसागरांच्या बीडमध्ये  14 हजार 944,  जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्र्यात 30,601, अमित देशमुख लातूरमध्ये 20,613, अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिममध्ये 17,007 इतके मुस्लीम दुबार मतदार होते. ही यादी मोठी आहे.


शेलार यांनी नाव सारखे, मतदार यादीतील क्रमांक वेगळा, नाव सारखे, पत्ता वेगळा, नावात अदलाबादल आणि मतदार क्रमांक सारखा, फोटो सारखा मतदार वेगळा, नाव एकच, लिंग वेगवेगळे, एका मतदाराचे अनेकदा नाव, एकाच मतदाराची एकाच मतदारसंघात दुबार, तिबार नावे, अशी मतदार यादीतील घोळाची अनेक उदाहरणे दिली.


शेलार यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आशिष शेलार यांनी आम्हाला फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आम्ही केलेला मतदारयाद्यांमधील घोळाचा आरोप मान्यच केला आहे. मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पप्पू ठरवले आहे. भाजपात सहसा फडणवीसांविरोधात बोलण्याचे धाडस कुणीही दाखवत नाही. पण शेलार यांनी ते धाडस दाखवले. हा कदाचित भाजपातील अंतर्गत वादाचा परिपाक असेल. मुख्यमंत्री बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करून घसा कोरडा करून आलेले असताना शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना या आरोपांचे अमृत पाजले. आम्ही मतदारयाद्यांमध्ये संपूर्ण सुधारणा करण्याची मागणी करत आहोत. कदाचित शेलार यांची त्यांच्याबरोबर (मुस्लीम) उठबस असेल म्हणून त्यांना मुस्लीम मतदारांच्या सदोष नोंदी सापडल्या. आमची तिकडे उठबस नाही.


तर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटले की, आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्याने तिला गंज लागला असेल. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगले मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे असे झाले असू शकते. दुबार मतदारयादीत हेच मतदार आहेत, हे शेलार कशाचा आधारावर सांगतात? शेलार यांनी शिवतीर्थावर यावे आणि यादी तपासावी.

दुबार नावांची आमची तक्रार-बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या विषयावर बोलताना म्हणाले की, कामठी, सिल्लोड व मालेगावातील मतदारयादीत अनेक नावे दुबार असून, त्याची तक्रार आम्हीही केली होती. नावांचे अ‍ॅडिशन होते, परंतु  डिलीशन होत नाही. मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. अशीच जर मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील 25 वर्षे महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले

सांगलीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठीची मोजणी रोखली

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या