Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या कोट्यवधी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. हप्त्याच्या वितरणाकडे लक्ष लागलेल्या सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.
ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून (4 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. लवकरच हा सन्मान निधी सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंची महत्त्वाची घोषणा
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे,’ असे नमूद केले.
मंत्री तटकरे यांनी योजनेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्व माता-भगिनींना एका महत्त्वाच्या प्रक्रियेची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे:
- E-KYC ची अट: योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी E-KYCकरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 - अंतिम मुदत: सर्व ‘लाडक्या बहिणीं’नी 18 नोव्हेंबर पर्यंत https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
 
काही दिवसांपूर्वी E-KYC करताना OTP न येणे किंवा तांत्रिक बिघाड यांसारख्या अडचणी येत होत्या. मात्र, सरकारने त्याची दखल घेऊन या तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत, ज्यामुळे E-KYC प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) November 3, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/Snf9kgFcvR
Ladki Bahin Yojana : योजनेतील लाभ आणि निकष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. ही योजना मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना योजने’वर आधारित आहे.
- मासिक मदत: योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
 - अपवाद: ज्या शेतकरी महिला केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेतात, त्यांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून’ दरमहा 500 रुपये दिले जातात.
 
या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आणि अपात्र पुरुषांनीही लाभ घेतल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेत पात्रता निकष अधिक कठोर केले आहेत आणि पात्र लाभार्थींनाच लाभ मिळावा यासाठी E-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
हे देखील वाचा –
अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








