US Transportation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. यांच्या निर्णयाने अनेक देशांना जोरदार धक्का दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गांभीर्याने घ्यावे का हा आजकालच्या काळात माध्यमांना पडलेला गहण प्रश्न आहे. आज एक बोलतील तर उद्या दुसरेच, पण ही व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर स्थानापन्न असल्यामुळे तिच्या वक्तव्याचे, क्षणैक भूमिकेचे पडसादही दूरगामी आणि प्रदीर्घकालीन असलयाचे वारंवार दिसून आले. त्याची विरोधाभासी वक्त्यव्य त्यांच्या बद्दल तर बोलायची सोया देखील लागली नाही आहे. त्यांच्या निर्णयाने जवळजवळ सगळ्याच देशांनी थोड्या ना थोड्या प्रमाणात खूप काही भोगलंय. पण त्याच्या एका निर्णयाची सर्वाधिक चर्चा होते ती टॅरिफची. त्यांनी भारत आमचा मित्र देश आहे असं बोलून भारतावरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलेलं आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर ट्रम्प यांनी वारंवार भारतावर भरगोस टीका केली. यात त्याच्या विरोधाभासी स्वभावाचे वारंवार दर्शन झाले. अशातच आता ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. जवजवळ ७ हजार ट्रक चालकांना ट्रम्प प्रशासनाने दणका दिला आहे.
या संदर्भांत अनेक वृत्त देखील प्रसारित करण्यात आले आहेत. यात इंग्रजी भाषेच्या चाचण्यांमध्ये ७ हजार ट्रक चालक अनुत्तीर्ण झाले असल्याची माहिती आहे. म्हणूनच त्यांना परवाने देण्यास बंदी घातली आहे. आणि मुख्य म्हणजे अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा भारतीय वंशाच्या चालकांना बसला आहे. त्यानुसार ट्रक चालकांसाठी आता इंग्रजी बोलण्याची चाचणी अनिवार्य केली गेली आहे. म्हणूनच आतापर्यंत तब्बल ७ हजार ट्रक चालक या चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये हजारो भारतीय वंशाचे ट्रक चालक असून त्यामध्ये बहुतेक बहुसंखी हे पंजाब आणि हरियाणामधले आहेत.भारतीय ट्रकचालकांशी संबंधित वारंवार होणारे रस्ते अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. या निर्णयाचा अमेरिकेतील भारतीय आणि भारतीय वंशाच्या ट्रक चालकांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील या ट्रक परवण्यासंदर्भात चालकांशी संबंधित क्षेत्रात लाखो शीख काम करत असून त्यापैकी सर्वाधिक चालक हे भारतीय आहेत.

वाहतूक सचिव शॉन डफी यांनी यासंदर्भात सोशल मीडिया एक पोस्ट शेयर करत अधीक माहिती दिली आहे. पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ७,२४८ ट्रक चालकांना सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे. उत्तर अमेरिकन पंजाबी ट्रकर्स असोसिएशनच्या मते अमेरिकेत काम करणारे सुमारे १,३०,००० ते १,५०,००० ट्रक चालक हे पंजाब आणि हरियाणातुन आलेले आहेत. त्यापैकी हजारो ट्रक चालकांना या नवीन नियमांचा चांगलाच फटका बसला आहे.
वाहतूक सचिव शॉन डफी हे सांगतात अमेरिकेच्या वाहतूक विभागाने व्यावसायिक ट्रक चालकांना मोठी रिग चालवण्यासाठी इंग्रजी बोलणे आणि समजणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना सेवेतून काढून टाकले जाईल. हे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने अमेरिकेचे रस्ते पुन्हा सुरक्षित करण्याबद्दल आहे!” असे डफी यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीयांना कसे नुकसान सहन करावे लागेल?
या धोरणाचा स्थलांतरित चालकांवर, विशेषतः भारतातील चालकांवर, विषम परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिकन पंजाबी ट्रकर्स असोसिएशनचा अंदाज आहे की १,३०,००० ते १,५०,००० भारतीय वंशाचे ट्रकचालक, बहुतेक पंजाब आणि हरियाणातील, अमेरिकेत काम करतात, त्यापैकी बरेच जण नवीन अंमलबजावणीमुळे प्रभावित झाले आहेत.
टेक्सास आणि कॅलिफोर्नियासारख्या राज्यांमध्ये भारत व्यावसायिक चालकांच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे, जिथे ट्रकिंग कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे की या उपाययोजनामुळे अमेरिकेतील दीर्घकाळापासून असलेली चालकांची कमतरता आणखी वाढू शकते.
“व्यावसायिक ट्रक चालकांना काम करण्यासाठी इंग्रजी बोलणे आणि समजणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना सेवेतून काढून टाकले जाईल,” डफी यांनी याचा पुनरुच्चार केला.
याआधी देखील ट्रम्प यांनी अनेक दावे केले. जे भारताने वारंवार आपल्या कृतीतून खोडून काढले. अर्थात अमेरिकेतील सत्य परिस्थिती किंवा तिकडे सुरु असलेल्या गोष्टींचा अंदाज आपण इथे लावू शकत नाही. पण ट्रम्प यांची भारतावरील सततची कुरघोडी यावर शंका आणण्यास भाग पाडते. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयावर सर्वच बाजूनी संमिश्र प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.
हे देखील वाचा – Deepti Sharma : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार दीप्ती शर्मा आहे DSP; किती पगार मिळतो? वाचा









