Home / महाराष्ट्र / Fertilizer Shortage : खताच्या टंचाईने बळीराजा त्रस्त?

Fertilizer Shortage : खताच्या टंचाईने बळीराजा त्रस्त?

Fertilizer Shortage : अवकाळी पावसाबद्दल जितकं बोलू तितकाच कमीच आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्यांना....

By: Team Navakal
Fertilizer Shortage
Social + WhatsApp CTA

Fertilizer Shortage : अवकाळी पावसाबद्दल जितकं बोलू तितकाच कमीच आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्यांना. या अवकाळीत शेतकऱ्याचे प्रचंड हाल झाले. हातातोंडाशी आलेला घास घेतील हिरावून घेतला. वेळेच्या आधीच आलेल्या पावसाने बळीराजा सुखावून तर गेला होता मात्र पडणाऱ्या सततच्या पावसाने आणि दिवाळी उलटून देखील पाऊस जायचं काही नाव घेत नाही आहे, त्यामुळे बळीराजच अतोनात नुकसान होत आहे. मालाला हवा तसा भाव मिळत नाही आहे. त्यामुळे आर्थिक टंचाई जाणवत आहे. तसेच शेतीसाठी लावलेला खर्च देखील सुटत नाही नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या सगळ्या संकटानंतरही शेतकऱ्यांनी हार न मानता झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे; परंतु ऐन पेरणीच्या हंगामातच राज्यात युरिया खताचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विविध खतांची गरज असते पण सध्या सातत्याने वापरले जाणारे खत युरिया खत खरेदीसाठी मात्र त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

काही बड्या वृत्तांनुसार चालू आर्थिक वर्षात भारतात होणारा युरियाचा वापर चार कोटी टनांच्या पराक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. पावसामुळे वाढती मागणी तसेच इतर खतांच्या किमती झपाटयाने वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात प्रामुख्याने हे खत सर्वाधिक वापरले जाते. त्यामुळे या वापरल्या जाणाऱ्या खताची विक्री २०२४-२५ मध्ये ३८.८ दशलक्ष टन या विक्रमी उच्चांकावर जाऊन पोहोचली होती. सुरु असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच सहा महिन्यांत या खताच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत २.१% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या नुकसानवर सरकार कसा तोडगा काढणार हे पाहण देखील तितकच महत्वाचं आहे. राज्यात होणारे शेती विषय असंख्य बदल त्यातूनही बळीराजा थांबला नाही. जगाच्या पोशिंद्यानें जिद्दीने यावर मात करण्याचा प्रयत्न केला परंतु तो आत कुठे तरी खचताना दिसत आहे.


हे देखील वाचा –

US Transportation : अमेरिकेच्या धोरणाचा भारतीय चालकांना मोठा फटका

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या