High Court on Voter List : मुंबई उच्च न्यायालयाने मतदार यादी संबंधित चार याचिकांसंधर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज मतदार यादी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या चारही महत्त्वाच्या याचिका फेटाळल्या आहेत. यामुळे याचिकाकर्त्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. कमी कालावधी, ऑनलाईन अर्ज करूनही नाव नसणे, आणि कट-ऑफ तारखेचा घोळ हे या सगळ्यात प्रमुख मुद्दे होते.
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आज मतदार यादी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या चारही महत्वपूर्ण याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मात्र याचा मोठा झटका बसला आहे. यात मुख्य म्हणजे, एका बाजूला न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादी संदर्भातील चार याचिका दाखल केल्या होत्या. या चार याचिकांमध्ये मतदार यादीच्या मसुद्यावर आक्षेप घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी, ऑनलाईन अर्ज करूनही यादीत नाव नसणे आणि मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी हे प्रमुख मुद्दे होते. या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. याचा अर्थ, मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांना दिलासा मिळालेला नाही.
हे देखील वाचा –
Stray Dog Issue : सुप्रीम कोर्ट शुक्रवारी देणार भटक्या कुत्र्यांबद्दल आदेश!









