Home / महाराष्ट्र / Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात निवडणुकीचे बिगुल तर वाजले; मात्र मतदार याद्यातील घोळ कायम?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात निवडणुकीचे बिगुल तर वाजले; मात्र मतदार याद्यातील घोळ कायम?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात कालच निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत....

By: Team Navakal
Maharashtra Local Body Election 2025
Social + WhatsApp CTA

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात कालच निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता २ डिसेंबरला मतदान होऊन लगेचच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यानुसार उमेदवारी अर्ज भरणे माघार घेणे यांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे खोळंबल्या आहेत. यात केवळ आता नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाही आहेत. मात्र जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्याही सर्व ठिकाणच्या निवडणुका अजूनही प्रलंबित आहेत.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारी पर्यंत पार पाडावी असा निर्देश दिला असल्याने त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने ह्या निवडणूका जाहीर केल्या जाणार आहेत. अशातच, पहिल्या टप्प्यात केवळ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. पण जिल्हा परिषदा आणि महापालिका यांच्या निवडणुकी बद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहेच.

निवडणूक यादीत दुरुस्त्या केल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत अथवा त्या निवडणुका तोपर्यंत पुढे ढकला’ अशी मागणी विरोध सातत्याने करत होत. पण त्या मागणीला राज्य निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र सध्या आहे.

खर तर सर्वच भागातून या संदर्भातील रोष व्यक्त होत आहे. निवडणूक इतका काळ आधीच खोळंबल्या होत्या त्यामुळे निवडणूक यादीत दुरुस्त्या करून मग ह्या निवडणूक का नाही घेतल्या आणखीन काही काळ याची वाट पाहायला आम्ही तयार होतो असा रोष आता सर्वसामान्यमध्ये देखील पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाचा हा आडमुठेपणा खरच गरजेचं आहे का? कि इतके दिवस जे तर्क लावले जात होते त्यात काही तथ्यता आहे. आपण लोकशाहीत जगतो पण खरच तस आहे का?जर तस नसेल तर मग ह्या निवडणूक का थोपवल्या जात आहेत असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर सगळ्या गोष्टी इतक्या खऱ्या आणि पारदर्शक असतील तर निवडणुकीपूर्वी याद्या का तपासल्या जात नाही आहेत? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

राज्याचे निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी या संधर्भात काल अधिकची माहिती दिली ते म्हणतात; निवडणुकांची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे, आम्ही केवळ आम्हाला मिळालेल्या मतदार यादीच्या आधारे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला’ असे सांगत राज्याचे निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत सरळ हात वर केले आहेत. पुढे मतदार यादीतील घोळाबाबत अधिक प्रश्न विचारले असता उत्तर देताना सांगण्यात आले ‘यावेळी आम्ही दुबार मतदार ज्या ठिकाणी असतील ती नावे खोडून काढू आणि मग त्या नावांच्या पुढे डबल स्टार लावण्यात येईल. त्यामुळे हे मतदार ओळखणे अधिक सोपे होईल आणि असे मतदार जर मतदानाला आले तर त्यांच्याकडून याविषयीचे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेऊ’ असे उत्तर राज्य निवडणूक आयोगानेकडून देण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या या उत्तराने विरोधक समाधानी नाही. या संधर्भात तीव्र शब्दात काही नेत्यांकडून निषेध देखील करण्यात आला. पण तस बघायला गेलं तर निवडणुकीच्या वेळी बऱ्याच गोष्टींवर लक्ष द्यावं लागत शिवाय वेळेचा अभाव. सकाळी जरी मतदानाला सुरवात केली आणि त्यात दुबार नावे आढळली तर हे काम प्रचंड वेळ खाऊ होईल, त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची तपासणी हि निवडणुकीच्या आधी करावी हे अत्यंत सोईस्कर देखील होईल. अश्या प्रतिक्रिया देखील काही सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

पुढे निवडणूक आयोग म्हणत कि ज्या मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले गेले आहे, त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे.असे उत्तर देऊन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बाकीचा अधिक तपशील देणे टाळले आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र वापरले जाणार आहे. पण या मतदानाची खातरजमा करण्यासाठी जे व्हीव्हीपॅट मशीन त्या ठिकाणी जोडले जाते तसे मशीन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोडले जाणार नाही अशी माहिती याआधी जाहीर करण्यात आली होती. त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

ज्या निवडणुकीच्या मतदार यादीबाबतच मोठा आक्षेप आहे त्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट नाही हे धक्कादायक आहे. पण राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे असे की अशा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट असणे बंधनकारक नाही आणि त्याबाबतचा कोणताही असा नियम नाही. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेविषयीच्या विरोधी पक्षांच्या मागण्या या धुडकावून लावल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या वैधतेबाबत लोकांच्या मनात देखील तितकाच संभ्रम आहे.

याबाबत विरोधकांनी या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर अनिल परब आणि राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अनिल परब म्हणतात आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार यादी स्वच्छ करून देण्याची मागणी केली होती. स्वच्छ करून देणे म्हणजे ज्या मतदार यादीत घोळ आहे, एका घरात ४०-५० मतदार नोंदवले गेले आहेत, अशी जी नावे आहेत, ही सगळी नावे यादीतून काढून टाकावी. आमचा निवडणुकीला विरोध नाही, मतदार याद्या दुरुस्त करून देण्यात यावी, हि आमची प्रमुख मागणी असलयाचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सांगतिले.

यानंतर राज ठाकरेंनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली, आणि आता याची खात्री पटली कि निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदारयादीतील अनेक घोळ यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोगच काय ? जबाबदारी कधीच झटकली, उत्तरदायीत्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचे काय करायचं, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.


हे देखील वाचा –

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मोठी रिअल इस्टेट डील! 13 वर्षांत 47% नफा; कोट्यावधींच्या फ्लॅट्स केली विक्री

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या