Home / News / Dawood’s Property Auction Fails : दाऊदची जमीन घेण्यास कुणीच तयार नाही! लिलाव अयशस्वी

Dawood’s Property Auction Fails : दाऊदची जमीन घेण्यास कुणीच तयार नाही! लिलाव अयशस्वी

Dawood’s Property Auction Fails – फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची जप्त केलेली मालमत्ता लिलावात विकली गेली नाही. केंद्र सरकारने सीलबंद...

By: Team Navakal
Dawood’s Property Auction Fails
Social + WhatsApp CTA

Dawood’s Property Auction Fails – फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची जप्त केलेली मालमत्ता लिलावात विकली गेली नाही. केंद्र सरकारने सीलबंद निविदा प्रक्रियेद्वारे या मालमत्तेचा लिलाव आयोजित केला होता. मात्र कोणत्याही खरेदीदाराने बोली लावण्यात रस दाखवला नाही.

या लिलावात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुमके गावातील सुमारे १७१ चौरस मीटर शेती जमीन आणि इतर काही भूखंडांचा समावेश होता. ही जमीन दाऊदची आई अमीना बी यांच्या नावावर होती आणि नंतर ती त्याची बहीण हसीना पारकरच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली होती.

सरकारने राखीव किंमत ३० टक्क्यांनी कमी करूनही कोणत्याही व्यक्तीने बोली लावली नाही. चार प्लॉट्सची एकूण किंमत सुमारे २० लाख रुपये ठेवण्यात आली होती. या लिलावातील अपयशामुळे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच दाऊदच्या मालमत्तेच्या विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही. ही जमीन स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्ट अंतर्गत जप्त करण्यात आली होती.


हे देखील वाचा – 

 भारत-पाकिस्तान सामन्यातील गैरवर्तनावर ICC चा मोठा निर्णय; रौफवर बंदी, सूर्यकुमार यादवलाही दंड

मविआ-मनसे विरोधानंतरही मतदारयाद्यां विरोधी याचिका फेटाळल्या

नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले

Web Title:
संबंधित बातम्या