Mumbai Monorail : आज सकाळीच वडाला डेपोजवळ मोनोरेल रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सकाळी ०९:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. नव्याने आणलेली Medha Servo Drives या कंपनीची मोनोरेल रेक चाचणी फेरीसाठी ह्या मोनो रेलचा वापर केला जात होता. सिग्नल यंत्रणेमधील काही समस्येमुळे संचलन नियंत्रण कक्षाला गाडीचे अचूक स्थान ओळखता अडथळे आले आणि गाडी रुळावरून दुसऱ्या रुळावर जाऊन समोरील बीमवर आदळली गेली. या अपघातात एका कोचचे अंडरकॅरेज नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांना परत पाठवले गेले. “ही घटना प्रत्यक्षात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या तयारीची एक ‘मॉक ड्रिल’ होती,” असल्याचा दावा MMRDA च्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेवर महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL)ने अधिकृत असे निवेदन जारी केले आहे. त्यांनी जरी केलेल्या निवेदनानुसार मोनोरेलमध्ये नवीन सिग्नल प्रणाली, नवीन मोनो गाड्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याचे काम सध्या सुरू असलायची माहिती त्यांनी दिली. मोनोरेलची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग प्रणालीची चाचणी सुरु असलयाचे देखील सांगण्यात आले.
MMMOCLने याबाबत अधिक स्पष्टता दिली आहे.“आज सकाळी चाचण्यांदरम्यान किरकोळ स्वरूपाची घटना घडली होती. परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणण्यात आली असून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. पुढे ते सांगतात “या चाचण्यांचा उद्देश प्रणालीची प्रतिक्रिया अत्यंत बिकट परिस्थितीत तपासणे हा होता. पुढे ते सांगतात या केवळ अंतर्गत तांत्रिक चाचण्या असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रणालींच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच मोनोरेल सेवा सुरू केली जाईल. असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
हे देखील वाचा –
दमदार Royal Enfield Bullet 650 सादर; भारतात कधी एंट्री-किती असेल किंमत? जाणून घ्या









