Rahul Gandhi Press Conference : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरु आहेत. अनेक सत्ताधारी नेते तसेच विरोधी पक्ष नेते आपले म्हणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. आता अशातच काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत बरेच मोठे खुलासे केले आहेत. सातत्याने मतचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी यांनी ह्या आरोपात किती तथ्यता आहे ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत मतचोरीचा आरोप करत आरोपांचा मोठा बॉम्ब फोडला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी आज यासंदर्भातील थेट पुरावेच सादर केले आहेत. ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणामध्ये मतदान केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणतात, पूर्ण जबाबदारीने मी हे सत्य बोलतोय. हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात आत पर्यंत मतदान चोरीचा संशय होता. निवडणुकीनंतर सर्व एग्झिट पोल्सनी काँग्रेसला क्लीन स्वीप दिलं होतं, पण पोस्टल आणि प्रत्यक्ष मतांमध्ये मात्र मोठी तफावत होती असेही ते म्हणतात. डेटाच्या आधारे त्यांनी हरियाणामध्ये ही मतदान चोरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचे देखील राहुल गांधी सांगतात. राहुल म्हणाले, “एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे देखील दाखवले जात होते. सर्व पोल हेच भाकीत करत होते, पण अचानक असे काय झाले की हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतांमध्ये तफावत दिसून आली?” याबद्दल राहुल गांधी यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणतात “आम्ही या सगळ्या तपशीलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जे आढळले त्यावर आम्हाला देखील विश्वास बसत नव्हता. मी माझ्या टीमला अनेक वेळा त्याची उलटतपासणी करण्यास देखील सांगितले. आम्ही जे पडताळून पहिले ते डेटासह १०० टक्के सिद्ध करू शकतो.
स्क्रीनवर सादरीकरण देत राहुल गांधींकडून एका महिलेचा फोटो दाखवण्यात आला. हरियाणामध्ये या महिलेने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा आरोप केला. सरस्वती, लक्ष्मी, अश्या खोट्या नावांचा आधार घेऊन वेगवेगळ्या बुथवर जाऊन या वेगवेगळ्या नावाने तिने मतदान केल्याचा दावा राहुल गांधीनी केला आहे. हरियाणा निवडणुकीदरम्यान ह्या महिलेने २२ वेळा मतदान केल्याचं आम्हाला आढळलं असून हे मतदान तेही बनावट ओळखपत्रांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे देखील राहुल गांधी यांनी सांगितले.
कर्नाटक सारखाच प्रकार या ठिकाणीही घडला. एकाच ठिकाणाहून ठरवलेला घोटाळा असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले. विमला, सरस्वती अश्या वेगवेगळ्या नावाने मतदान करणारी तरुणी ही ब्राझीलची तरुणी आहे. ह्या ब्राझीलच्या तरुणीचे हरियाणाच्या निवडणुकीत काय काम? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला. या महिलेच्या फोटोवर आधारित बनावट आयडी हे फक्त दोन मतदान केंद्रांमध्येच दोनशेहून अधिक वेगवेगळ्या नावांनी अस्तित्वात असलायचा गंभीर स्वरूपाचा दावा राहुल गांधींनी केला.
याशिवाय ते पुढे सांगत दोन पोलिंग बूथ्सवरील सीसीटीव्ही फुटेज देखील जानबूजकर डिलीट करण्यात आलं आहे, असं राहुल गांधीच मत आहे. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी ब्लर फोटो आयडी वापरून मतदान करण्यात आलं. याचाच अर्थ फसवणुकीचा पद्धतशीर डाव यामध्ये रचला गेला होता असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राहुल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा एक व्हिडिओ फुटेज दाखवलं आहे. ते पुढे सांगतात की निवडणुकीच्या दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी सिस्टमचा उल्लेख केला. यात पुढे ते सांगतात आम्ही एकतर्फी विजयाचा दावा केला होता. आम्ही सगळी व्यवस्था केली असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. राहुल यांनी या वक्तव्यावर सैनी यांच्या स्मितहास्याकडे जनतेचं लक्ष वेधले. हा प्रचंड मोठा घातपात असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर विविध स्तरावरून आता प्रतिक्रिया येत आहे.
हे देखील वाचा – Mumbai Monorail : मोनोरेल अपघातांच्या मालिकांना ब्रेक नाहीच; चाचणीदरनाम्यान नव्या मोनोरेलचा अपघात..









