Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला..

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला..

Uddhav Thackeray : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तसेच...

By: Team Navakal
Uddhav Thackeray
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तसेच वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. काही दिवसांपासून अजित पवारांचं एक वाक्य प्रचंड गाजत आहे ते म्हणजे “आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही जनतेला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं” असं अजित पवार म्हणाले. तसेच ते शेतकऱ्यांना पुढे म्हणाले, “सारखी कर्जमाफी मागण्यापेक्षा तुम्ही सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत.” यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून यावेळी ते पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. आज त्यांनी बीडमधील ग्रामस्थांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, ‘अजित पवार बेधडकपणे सांगतात की आम्हाला निवडणुकीत जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आमच्या समोरही तितक्याच अडचणी आहेत. त्यामुळे तुम्ही जरा हातपाय चालवा.’

यावर संतापून उद्धव ठाकरे पुढे म्हणतात अहो, अजित पवार तुम्ही कोणाला हातपाय हलवायला सांगताय? “तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय. हातपाय हलवूनही त्यांच्यावर इतकं मोठं संकट ओढवलं आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीच इतकी मोठी होती कि शेतकरी काय करू शकतो. त्या शेतकऱ्याला तुम्ही हातपाय हलवायला सांगताय. मग तुम्ही काय करत आहात? तुम्ही सरकार हलवताय का? पुढे ते म्हणतात मी काही वेडंवाकडं बोलत नाही. मी असंच म्हटलं, कि अजित पवार तुम्ही सरकार हलवताय ना?”असे म्हणतात उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना खडे बोल सुनावले आहेत.


हे देखील वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे सडेतोड उत्तर..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या