Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्न कायमच महत्वाचा विषय ठरला आहे. आणि आता याच संधर्भात ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांनाच संताप उफाळून आला असून, आंदोलन पेटण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे पोलिसांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाल्याने या आंदोलनाला आता वेगळंच वळण मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त असूनदेखील पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत उसाच्या कांड्या बाजूला केल्या.
हे देखील वाचा –
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला..









