Mahadev Betting App – दोन वर्षापूर्वी महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा (Online Betting Scam) समोर आला होता. याप्रकरणी डिसेंबर २०२३ मध्ये घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रवी उप्पलला (Ravi Uppal)दुबईमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र आता हाच मुख्य आरोपी रवी उप्पल दुबईतून बेपत्ता झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या (Red Corner Notice) आधारे रवी उप्पल याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार होते,पण प्रत्यार्पण प्रक्रिया प्रलंबित राहिली आणि ४५ दिवसांनंतर रवी याची सुटका करण्यात आली होती.भारतीय अधिकाऱ्यांना किंवा युएईला (UAE authorities)त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे वृत्त आहे. तो बेपत्ता झाला आहे.रवी हा युएई सोडून अज्ञात ठिकाणी गेला आहे.
रवी उप्पलचा सहकारी सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar)अजूनही दुबई अधिकाऱ्यांच्या (Dubai authorities.)ताब्यात आहे.रवीकडे दक्षिण प्रशांत महासागरातील (South Pacific Ocean)एका बेट असलेल्या वानुआटुचा पासपोर्ट आहे. हा तोच देश आहे ज्याचा पासपोर्ट ललित मोदींकडे (Lalit Modi)देखील होता. नंतर वानुआटुने ललित मोदीचा पासपोर्ट रद्द केला आणि म्हटले की प्रत्यार्पण टाळणे हे त्या देशात नागरिकत्व मिळविण्याचे वैध कारण नाही.
ऑस्ट्रेलियापासून अंदाजे २००० किमी अंतरावर असलेल्या पोर्ट विला ही वानुआटुची राजधानी आहे.रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर,त्यांच्याकडे वानुआटुचे नागरिकत्व देखील आहे,त्यांनी त्यांचे गुन्हेगारी नेटवर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेटांवर मालमत्ता खरेदी केल्या आहेत.२०१८ मध्ये स्थापन झालेले महादेव अॅप दररोज २०० कोटी रुपयांचा नफा कमवत असल्याचा आरोप आहे.
हे देखील वाचा –
नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले
मविआ-मनसे विरोधानंतरही मतदारयाद्यां विरोधी याचिका फेटाळल्या
देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली









