Medha Kulkarni Hospitalised : गेल्या काही काळापासून एका मागोमाग एक दिग्गज नेते आजारी पडत आहेत. याआधी संजय राऊत यांना देखील त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय यात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा देखील नंबर आहे. यांच्यानंतर आता पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रकृती देखील अचानक बिघडल्याचे माहिती समोर येत आहे.
मेधा कुलकर्णी या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर अतिशय आक्रमक भूमिका घेतात. पुण्यात त्यांनी आजवर अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवले आहेत. आज अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखवलं केलं. या संदर्भातील माहिती त्यांनीच स्वतः एक्स पोस्टद्वारे दिली आहे. कुलकर्णी यांनी म्हटलं की, “प्रकृती अस्वस्थतेमुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळं काही दिवस आपल्या संपर्कात नसेन, त्याबद्दल दिलगीर व्यक्त करते. काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी सहज संपर्क करू शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू” अशी पोस्ट एक्सवर केली आहे. पण त्यांना नेमकं काय झालं आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट महिती समोर आली नाही.
हे देखील वाचा – Sanjay Raut : संजय राऊत मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल..









