Home / देश-विदेश / Maldives Tobacco Ban : Gen Z ला धूम्रपान बंदी? जनरेशनल धूम्रपान बंदी करणारा मालदीव ठरला जगातील पहिला देश

Maldives Tobacco Ban : Gen Z ला धूम्रपान बंदी? जनरेशनल धूम्रपान बंदी करणारा मालदीव ठरला जगातील पहिला देश

Maldives Tobacco Ban : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाणारा मालदीव आता आरोग्य क्षेत्रातील एका ऐतिहासिक निर्णयामुळे चांगलाच चर्चेत असल्याचे दिसून येत...

By: Team Navakal
Maldives Tobacco Ban
Social + WhatsApp CTA

Maldives Tobacco Ban : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाणारा मालदीव आता आरोग्य क्षेत्रातील एका ऐतिहासिक निर्णयामुळे चांगलाच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. मालदीव सरकारने १ जानेवारी २००७ नंतर जन्मलेल्या कोणत्याही नागरिकाला तंबाखूचे सेवन, खरेदी किंवा विक्री करण्यावर पूणर्पणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे “जनरेशनल तंबाखू बंदी” लागू करणारा मालदीव हा जगातील सर्वात पहिला देश ठरला आहे.

तंबाखू नियंत्रण मंडळाचे उपाध्यक्ष अहमद अफाल म्हणाले की, यामुळे विक्रेत्यांना कोणतीही विक्री करण्यापूर्वी ग्राहकाचे वय तपासणे हे बंधनकारक असणार आहे. ई-सिगारेटसारख्या आकर्षक गॅझेट्स”च्या माध्यमातून तंबाखू उद्योग तरुण पिढीला व्यसनाधीन बनवत होता, त्यामुळे अशी कठोर पावले उचलणे भाग होते. मालदीवने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि वेपिंग उत्पादनांची आयात, विक्री, वापर आणि वितरण पूर्णपणे बंदी घातली आहे.

दरम्यान, मालदीवने हा कायदा लागू केला असताना न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये मात्र जनरेशनल स्मोकिंग बंदीवर अडथळे आले आहेत. न्यूझीलंडमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२३ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला, तर यूकेमध्ये २००९ नंतर जन्मलेल्यांना धूम्रपानापासून रोखणारे विधेयक सध्या संसदेच्या अंतिम टप्प्यात आहे.

या कायद्याचे पालन मालदीवला भेट देणाऱ्या प्रत्यक पर्यटकांनाही करावे लागणार आहे. मात्र, या बंदीमुळे देशाच्या पर्यटनावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असा सरकाराने विश्वास दाखवला आहे. “लोक केवळ धूम्रपान करण्यासाठी मालदीवला येत नाहीत. ते इथल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी, समुद्रासाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि ताज्या हवेसाठी मालदीवला येतात,” असे अफाल यांनी स्पष्ट केले.


हे देखील वाचा –

Human -leopard Conflict : मानव- बिबट्याचा संघर्ष रोखणार ; ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर ; पिंजरे,कॅमेरे, पॉवर टॉर्च तयार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या