Dhangakar vs Mohol: शिवसेना (ShivSena) महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपा (BJP) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला असा आरोप धंगेकर यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी (Local body Elections) आधी महायुतीतला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
धंगेकर कालच मुंबई दौऱ्यावरून परतले.त्यानंतर आज त्यांनी आरोप केला की, पौडफाटा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केला आहे. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवून ३० ते ४० साथीदारांसह ‘मेगा सिटी’ वस्तीत घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांच्यासह महिलांवर हल्ला केला. यावेळी मोहोळ यांच्यावर गुन्हेगारी पोसण्याचा आरोप करत सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो, बाकी गुन्हेगारीची पाळेमुळे इथेच आहेत, अशी टीकाही केली.
जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. आता रफिक शेख नावाच्या व्यक्तीचे अभिनंदन केल्याचे पत्र आणि फोटो पोस्ट करून धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळ यांना लक्ष्य केले आहे.
हे देखील वाचा –
नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता
देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली









