Indurikar Maharaj Daughter Engagement : समाजप्रबोधनकार म्हणून महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे त्यांच्या विनोदी आणि प्रबोधनात्मक कीर्तनांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते.
महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
संगमनेरमध्ये शाही सोहळा
ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक साहिल चिलाप यांचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे अत्यंत पारंपरिक पण राजेशाही पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, वर आणि वधूची रथातून काढलेली राजेशाही मिरवणूक. कार्यालयात वारकरी वेशात टाळकरी आणि महिलांनी धरलेला फेर यामुळे या सोहळ्याला एक वेगळी शोभा आली होती.
या समारंभाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांसारख्या अनेक राजकीय मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
कोण आहेत इंदुरीकर महाराजांचे जावई?
महाराजांचे जावई साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेदे येनेरे गावचे मूळ रहिवासी आहेत. ते उच्चशिक्षित असून, सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय तसेच गावाकडे बागायती शेती आहे.
#सहजच
— Ashutosh Wagh (@EminentRealtors) November 5, 2025
"लग्न नाही केलं तरी मुलं होतात" हे इंदुरीकर महाराज सांगायला विसरले होते.
🫣😉😜😁😂🤣👇🏻👇🏻 pic.twitter.com/20DOFR8fKc
इंदुरीकर महाराजांनी मारली पहा पलटी लोकांना दाखवायला मोठा साखरपुडा केला जेवनात फक्त महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवन मंग लोकं काय इटालियन पध्दतीचे जेवन ठेवत होते काय …?
— नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य (@nastikpakyabhau) November 5, 2025
"लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण"
महाराज लग्न आजुन जोरात झाले पाहिजे नवरा नवरीची ग्रॅंड एन्ट्री गाणं कोणतं… pic.twitter.com/nwzLNkUj7T
इंदुरीकर महाराजांवर टीका
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून अनेकदा ‘साधेपणा’ आणि ‘कर्ज काढून मोठे लग्न करू नका’ असा उपदेश करत असतात. मात्र त्यांच्या मुलीचा हा साखरपुडा राजेशाही थाटात पार पडल्यामुळे सोशल मीडियावरून टीका होत आहे.
हे देखील वाचा – Starlink Maharashtra : डिजिटल महाराष्ट्राला मिळणार गती! मस्क यांच्या ‘स्टारलिंक’सोबत करार करणारे ठरले देशातील पहिले राज्य









