RCB initiate sale process : आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) मधील लोकप्रिय फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (RCB) आता अधिकृतपणे विक्रीसाठी काढण्यात आली आहे. आरसीबी टीमची मालक कंपनी Diageo ने हा निर्णय घेतला असून, त्यांनी ही विक्री प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Diageo या युके-आधारित कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला (BSE) पत्र पाठवून यासंबंधी खुलासा केला. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ची पूर्ण मालकी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) मधील गुंतवणुकीच्या ‘धोरणात्मक आढावा’ प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी कळवले आहे.
विक्रीचे कारण आणि अंतिम मुदत
USL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सोमेश्वर यांनी स्पष्ट केले की, आरसीबी फ्रँचायझी कंपनीसाठी एक मौल्यवान मालमत्ता असली तरी, तो कंपनीच्या मुख्य ‘अल्कोबेव्ह’ (Alcoholic Beverages) व्यवसायाचा भाग नाही. भागधारकांकडून असलेल्या दबावामुळे आणि कंपनीचे दीर्घकालीन मूल्य वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या विक्री प्रक्रियेसाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षी 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या एका दुर्दैवी चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांनी जीव गमावल्यापासूनच कंपनीवर ही फ्रँचायझी विकण्याचा दबाव वाढत होता.
कोणकोण आहेत संभाव्य खरेदीदार?
आरसीबी फ्रँचायझी विकत घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. यामध्ये अमेरिकेतील एक खासगी गुंतवणूक कंपनी, अदानी ग्रुप, JSW ग्रुपचे जिंदाल, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर्श पूनावाला आणि देवयानी इंटरनॅशनल ग्रुपचे रवी जयपूरिया यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – किंमत फक्त 15 हजार रुपयांपासून! लाँच झाला Moto चा शानदार 5G स्मार्टफोन; मिळेल 7000mAh बॅटरी









