Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचे विचित्र निर्णय आणि त्याचे विरोधाभासी वक्तव्य ह्यामुळे ते जगभरात कायमच चर्चेचा विषय असतात. पण आता याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशातील न्यूयॉर्क महानगरीतील मतदारांनी जोरदार धक्का दिल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदी ट्रम्प यांनी जोरदार विरोध केलेले झोहरान ममदानी यांचा मोठा विजय झाल्यामुळे ट्रम्प तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय त्यांना आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही जोरदार धक्का लागल्याचे देखील दिसत आहे.
खर तर कोणत्याही मोठ्या देशातील एखाद्या मोठ्या शहराचा महापौर होणे किंवा त्या पदाची निवडणूक होणे ही राष्ट्रीय राजकारणात इतकी मोठी गोष्ट नाही. पण अमेरिकेत महानगरांचे महापौर हेसुद्धा मोठे सत्ताकेंद्र असल्याचे मानले जाते. आणि त्यातही न्यूयॉर्कसारख्या सर्वात मोठ्या शहराचा महापौर होणे ही छोटी बात नक्कीच नाही. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक अध्यक्ष डोनाल यांनीसुद्धा प्रतिष्ठेची केली होती.
या निवडणुकीमध्ये ममदानी यांना डेमोक्रॅटिक या पक्षातर्फे उमेदवारी मिळाली होती, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे स्लीवा हे उमेदवार म्हणून उभे होते. निवडणुकीमध्ये तिसरे उमेदवार न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर कुओमो हे देखील होते. या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. शिवाय त्यांना तिसऱ्या स्थानावर जाव लागल.
कारण या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला मिळाली होती. या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्कला विकासासाठी निधी मिळणार नसल्याची गंभीर अशी धमकी देखील ट्रम्प दिली होती. अर्थात, या धमकीला न्यूयॉर्कमधील मतदारांनी जराही भीक घातली नाही आणि त्यांनी मोठ्या मताधिक्याने ममदानी यांना महापौर पदासाठी विजयी करून दिले. फक्त ३४ वर्षांचे असलेले ममदानी यांनी ह्या निवडणूकीत विक्रमी विजय प्राप्त केला आहे. तर या शिवाय न्यूयॉर्कचे प्रथम मुस्लीम महापौर होण्याचा मानही मिळवला. त्यांची आई मीरा नायर या प्रख्यात भारतीय निर्माता दिग्दर्शक देखील आहेत.
महापौरपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ममदानी यांनी थेटपणे ट्रम्प यांना आव्हान दिलेच शिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका गाजलेल्या विधानाचाही उल्लेख केला. सुडाचे राजकारण करण्यामध्ये प्रख्यात असलेले डोनाल्ड ट्रम्प आगामी कालावधीमध्ये याबाबत कोणती पावले उचलतात हे पाहणे जरी महत्त्वाचे असले तरी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये कशाप्रकारे पराभूत करता येऊ शकेल याचा दाखला मात्र मतदारांनी निश्चितच घालून दिला आहे. ज्या प्रकारे ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन या मंत्रांचा जप करत अमेरिकेची मूलभूत व्यवस्थाच विस्कळीत केली आहे, त्यावरून अमेरिकेत सार्वत्रिक पातळीवर नाराजी आहे.
ट्रम्प यांनी जारी केलेले टॅरिफ धोरण असो किंवा इमिग्रेशनचे नियम असोत यामुळे सर्वसामान्यांना मात्र त्रासच झाला आहे. मात्र ममदानी यांची भूमिका याबाबत अत्यंत स्पष्ट आहे. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक द्वेषाचे किंवा वांशिक भेदाचे राजकारण करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे आणि त्यांनी अनेक वेळा आपली ही पॉलिसी सरे आम जाहीर देखील केली होती. म्हणूनच ट्रम यांनी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. पण या सगळ्याला न जुमानता ममदानी यांनी घरोघरी जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली त्याचा चांगलाच परिणाम यावेळीच्या निवडणुकीवर झाला. ममदानी यांचे तरुण वय त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा, तसेच त्यांचा स्पष्टवक्तेपणा शिवाय त्यांची पटणारी मते याचा एकत्रित परिणाम होऊनच न्यूयॉर्कमधील मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला.
हे देखील वाचा –
किंमत फक्त 15 हजार रुपयांपासून! लाँच झाला Moto चा शानदार 5G स्मार्टफोन; मिळेल 7000mAh बॅटरी









