Omkar Elephant : आज काल प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष दिवसागणिक अधिकच वाढतच चालला आहे. पण असं का? या आधी हि वन्य प्राणी होते. पण फक्त कदाचित तेव्हा मानसिकता वेगळी असावी. दिवसेंदिवस प्राणी आणि मानवामध्ये वाढणार संघर्ष हा जीवघेणा ठरत चाललं आहे. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही. असं म्हणतात या धर्तीवर सगळ्यात जास्त बुद्धिमान प्राणी कोण असेल तर तो मानव.
मुक्या प्राण्याना बोलता येत नाही पण मानव तर सुजाण आहे ना? बिबट्या हत्ती वाघ यांसारखे प्राणी मानवी वस्तीत फिरणं धोक्याच पण या संधर्भात यंत्रणेने अधिक तत्परता दाखवणे महत्वाचे. यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. हे चुकीचेच पण आपण केलेल्या चुकांवर यासगळ्यामुळे पडदा पडतो असे नाही. अनेक जण तर जंगल सफारीला जातात वाघ हत्ती बघायला पण आता हि परिस्थिती इतकी भयावह झाली आहे कि वाघ आणि हत्ती मानवाला भेटायला मानव वस्तीत येतात. आधी गोड गोंडस वाटणारे हे प्राणी अचानक राक्षस वाटू लागले आहेत. खरच आपण या बद्दल कधी समजुदारपणे विचार केला आहे का? पण हे एवढ्यावरच मर्यादित आहे का तर नाही. आपणच जर आपल्या सृष्टीने तयार केलेल्या नैसार्गिग गोष्टीच जर संपल्या तर खरच आपली सृष्टी टिकून राहील का?
सध्या असाच एक हत्ती अवघ्या महाराष्ट्रभर फिरतोय. कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींच्या कळपाने मागच्या २३ वर्षांपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत शेतकऱ्यांच्या नाकात दम केला आहे. याच कळपातील एक हत्ती सध्या राज्यभर फिरतोय. सुमारे १० ते १२ वर्षांचा हा ‘ओंकार’ नावाचा हत्ती मागच्या काही काळापासून महाराष्ट्र आणि गोव्यात या राज्यात फिरत होता आणि आता तो परत एकदा महाराष्ट्र राज्यात आला आहे. पण या हत्तीला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हवी तशी प्रयत्नशीलता दिसून येत नाही आहे. आणि त्यामुळेच हि तिन्ही राज्ये ओंकार हत्तीला पकडण्यात अपयशी ठरले.
ओंकार हत्ती आणि त्याचा कळप हा सुरवातीला गोव्यात होता. त्यानंतर गोव्यातूनच आपल्या कळपापासून हा हत्ती वेगळा झाला. आणि त्यानंतर त्याची भटकंती सुरु झाली. या दरम्यान त्याची प्रचंड अशी दहशत वाढली. त्यात त्याने दोडामार्गमधील एका ७० वर्षीय वृद्धाला चिरडले. सरकारने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला, परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.त्यानंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सीमावर्ती भागात काही काळ फिरत होता. त्यानंतर तो उत्तर गोव्यात १४ दिवस वास्तव्यासाठी होता. या भागातील भातशेती आणि नारळाच्या झाडांचे प्रचंड नुकसान केले. आणि त्यानंतर तो परत वळला ते महाराष्ट्रात. त्यांने मध्यन्तरी मुंबई गोवा महामार्गावरही काही काळ वाहतूक अडवून धरली होती. आणि सध्या तो याच परिसरात असल्याचे म्हटले जाते. या हत्तीला बारक्या हत्ती असेही म्हणतात.
यावर वन विभाग काय करतय?
या ओंकार हत्तीला ३१ डिसेंबरपर्यंत पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. पण या आधीच काय? या समस्येवर या आधीच तोडगा का नाही काढला? असा प्रश्न देखील स्थानिक पातळीवर विचारला जात आहे. या आधी ओंकार हत्तीच्या हल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोडामार्ग तालुक्यातील एका शेतकऱ्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्याच काजूच्या बागेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहितीत कळताच आजू बाजूचे शेतकरी जमा झाले. या घटनेची माहितीत लगेच वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखवलं झाले. जागेची पाहणी करून हे सिद्ध झालं कि या शेतकऱ्याचा मृत्यू ह्त्तीमुळे झाला. या घटने नंतर गावकरी मात्र मोठ्या प्रमाणात संतप्त झाले. जोपर्यंत हत्ती पकड मोहिमेची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका देखील गावकरण्यानी घेतली. गावात आलेले लोक प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनासुद्धा गावकरण्यानी जवजवळ १० तास रोखून धरलं होत. गावातला रास्ता सुद्धा त्यांनी अडवला होता. त्यानंतर जेव्हा वनविभागाकडून हत्तीला पकडलं जाईल असं लेखी अश्वासन मिळालं तेव्हा त्यानी शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पण या सगळ्या गोष्टी या आधीच होणं अपेक्षित होत.
आणि आता या मोहिमेसाठी करता वन कर्मचारी, पशुवैद्याक आणि पोलीस दलातील कर्मचारी यांचा समावेश असलेली एक तगडी टीम तयार करण्यात आली आहे. या हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ५० स्थानिक तरुणांना देखील नेमण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी कर्नाटकची मदत घेतली जाणार असल्याची देखील माहिती आहे. यासाठी कर्नाटक कुमकी हत्तींसह (प्रशिक्षित हत्ती) तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शन करून ह्यओंकारह्णला शांत करणार आहेत अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी या बाबत अधिक माहिती दिली आहे. ते सांगतात सध्या ‘ओंकार’ महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या कास, सातोसेमधून इन्सुली, वाफोली, भालवल परिसरात वावरत आहे. तिथे तेरेखोल नदी देखील आहे. त्यामुळे हा परिसर हत्तीला पकडण्यासाठी अजिबात योग्य नाही. तो योग्य जागी पोहोचल्यावर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते सांगतात. ओंकार हत्ती सध्या शांत आणि माणसाळल्यासारखा जरी वाटत असला तरी कळपापासून दुरावला असल्याने तो बिथरण्याची शक्यता जास्त आहे. मोठे आवाज आणि गर्दीमुळेही तो आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरी भागापासून दूर मोकळ्या जागेत नेऊन त्याला पकडण्यावर भर आहे असेही ते म्हणतात. हा प्रश्न वेळीच मार्गी लागणे अत्यंत घरजेचे आहे अन्यथा मानव आणि वन्यजीव संघर्ष अटळ असल्याचे दिसून येते.
हे देखील वाचा –
Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांची न्यूयॉर्कमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला?









