Parth Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल आहे. आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आता प्रशासन ऍक्शन घेत असून तहसीलदार सूर्यकांत येवले याचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर या प्रकरणी पुणे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थेतील मोठे अधिकारी दोषी आढळल्याचे समोर आले आहे. आणखी काही अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे का याची देखील कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे या संधर्भात आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
जे प्रकरण समोर आले आहे ते अतिशय गंभीर आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रकरणावर मुख्यमंत्रीनी अधिक माहिती दिली आहे ते म्हणतात या प्रकरणाच्या योग्य त्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ह्या प्रकरणाची सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे. माझ्याकडे अजून पर्यंत पूर्ण माहिती आलेली नाही. जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या प्रकरणावर अजित पवारांनी बोलणे टाळले-
या प्रकरणासंदर्भात अजित पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता यावर उत्तर देणं अजित पवारांनी टाळले आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण कोणतं नवीन वळण घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –









