Ajit Pawar on Parth Pawar Land Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रान पेटले आहे. विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संधर्भात चौकशीचे आदेश दिले तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलत ते म्हणाले “माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता सध्या माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा लांब पर्यंत देखील काही संबंध नाही. ३५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखत आली आहे. मी या प्रकरणाची सखोल माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी असे काहीतरी सुरु असल्याचे देखील माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत, अशा सूचना देखील मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले? मला याबद्दल काहीच माहीत नाही”, असे देखील अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणतात मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, अश्या पद्धतीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून याबद्दल आदेश दिलेले नाहीत. उलट यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन की, जर माझ्या नावाचा वापर करून कोणीही चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा कधीही नसेल. मी कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे.”असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा –
Shikhar Dhawan Suresh Raina ED Case : सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीकडून झटका..









