Home / महाराष्ट्र / Google Pixel Watch : Google Pixel Watch 4 चा सेल अखेर सुरू; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरच काही..

Google Pixel Watch : Google Pixel Watch 4 चा सेल अखेर सुरू; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरच काही..

Google Pixel Watch : स्मार्ट वस्तू म्हटलं कि त्या अगदी प्रत्यकालाच हव्या हव्याश्या वाटतात. त्यामुळे अनेकजण अश्या वस्तूंच्या शोधतात देखील...

By: Team Navakal
Google Pixel Watch
Social + WhatsApp CTA

Google Pixel Watch : स्मार्ट वस्तू म्हटलं कि त्या अगदी प्रत्यकालाच हव्या हव्याश्या वाटतात. त्यामुळे अनेकजण अश्या वस्तूंच्या शोधतात देखील असतात. तुम्ही देखील स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर हि बातमी नक्की वाचा. गुगलचे लेटेस्ट स्मार्टवॉच Google Pixel Watch 4 ची विक्री कालपासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून भारतात सुरू झाली आहे. Google Pixel Watch 4 हे स्मार्टवॉच अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला खरेदी करता येणार आहे. मुख्य फीचर्सचा विचार करता हे स्मार्टवॉच 5 ATM आणि IP68 रेटिंगसह मिळणार आहे. यात तुम्हाला 3D कर्व्ड AMOLED स्क्रीन मिळते. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये ७२ तास टिकणारी शक्तिशाली बॅटरी आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर यांसारखे ऍडव्हाणस आरोग्य फीचर्स देखील मिळणार आहे.

Google Pixel Watch 4 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या वॉचच्या 41mm Wi-Fi व्हेरिएंटची किंमत ३९,९०० रुपये इतकी आहे. याचे 45mm मॉडेल ४३,९०० रुपयांना उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट गुगल इंडियावरून खरेदी करता येऊ शकते .ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट वर देखील लवकरच याची विक्री सुरू होणार आहे.

Google Pixel Watch 4 मध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले देखील आहे. याची ब्राइटनेस ३००० निट्स आहे आणि कलर गॅमट DCI-P3 आहे. याचा रिफ्रेश रेट 60 Hz पर्यंत असणार आहे. प्रोटेक्शनसाठी यात 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी वॉचमध्ये क्वालकॉमची स्नॅपड्रॅगन W5 Gen2 चिप सुद्धा देण्यात आली आहे. Google Pixel Watch 4 हे स्मार्टवॉच वेअर ओएस ६.० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे. या वॉचमध्ये 32 GB स्टोरेज आणि 2 GB रॅम देखील असणार आहे. यात कंपास, अल्टीमीटर, रेड, टेम्परेचर आणि इन्फ्रारेड सारखे अत्यंत महत्त्वाचे असे सेन्सर आहेत. त्यांच्यासह, SpO2, हार्ट-रेट आणि cEDA ट्रॅकिंग आपल्याला मिळणार आहे. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप सामान्य वापरात ४० तास आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये ७२ तास इतका आहे.

Google Pixel Watch 4 या मल्टि स्मार्ट वॉचमध्ये एक साइड बटण आणि नियंत्रित करण्यासाठी हॅप्टिक क्राउन आहे. याचे रेटिंग 5 ATM आणि IP68 इतके आहे. कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ 5.6, Wi-Fi 6, GPS, ग्लोनास आणि एनएफसीद्वारे सपोर्टेड देखील आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पिक्सेल वॉच ४ च्या 41mm मॉडेलमध्ये 325mAh ची बॅटरी आहे, जी फुल चार्जमध्ये 30 तास आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये ४८ तासांपर्यंत टिकते. तर याच्या ४५ mm व्हेरिएंटमध्ये 455mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.


हे देखील वाचा –

Shikhar Dhawan Suresh Raina ED Case : सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीकडून झटका..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या