Home / मनोरंजन / Rashmika Vijay Wedding : रश्मिका-विजय कधी करणार लग्न? तारीख आली समोर

Rashmika Vijay Wedding : रश्मिका-विजय कधी करणार लग्न? तारीख आली समोर

Rashmika Vijay Wedding Date : सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाची सध्या...

By: Team Navakal
Rashmika Vijay Wedding
Social + WhatsApp CTA

Rashmika Vijay Wedding Date : सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांना आवडणारी ही जोडी गेल्या महिन्यात साखरपुड्यामुळे चर्चेत आली होती.

ऑक्टोबर 2025 मध्ये विजय देवरकोंडाच्या टीमने त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला होता.

आता या जोडप्याने त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. खासगी साखरपुड्यानंतर, ‘खुशी’ (Khushi) फेम विजय आणि ‘पुष्पा’ (Pushpa) फेम रश्मिका पुढील वर्षाच्या सुरुवातीला एका आलिशान राजेशाही विवाहसोहळ्याची योजना आखत आहेत.

उदयपूरमधील पॅलेसमध्ये लग्न

‘thecinegossips’ या सोशल मीडिया अकाउंटने केलेल्या पोस्टनुसार, रश्मिका आणि विजय यांचा विवाह 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधील एका सुंदर पॅलेसमध्ये आयोजित केला जाईल. ही डेस्टिनेशन वेडिंग वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित घटना ठरू शकते, असा चाहत्यांचा अंदाज आहे. मात्र, या दोन्ही कलाकारांकडून त्यांच्या लग्नाच्या बातमीची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

गुपचूप पार पडलेला साखरपुडा

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांचा साखरपुडा ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये केवळ जवळच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. विजय देवरकोंडाच्या टीमने साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला होता आणि लग्न फेब्रुवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली होती.

एका चित्रपट प्रमोशन इव्हेंटमध्ये (Event) रश्मिकाला साखरपुड्याबद्दल विचारले असता, तिने हसून उत्तर दिले, “याबद्दल सर्वांनाच माहिती आहे,”

रश्मिका आणि विजय यांची चित्रपट

रश्मिका मंदाना सध्या व्यावसायिक आघाडीवर खूप व्यस्त आहे. या वर्षी तिचे ‘छ्छावा’ (Chhaava), ‘सिकंदर’ (Sikandar), ‘कुबेरा’ (Kuberaa) आणि ‘थम्मा’ यांसारखे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. तिचा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेन्ड’ (The Girlfriend) 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘कॉकटेल 2’ आणि ‘मायसा’ या चित्रपटातही दिसणार आहे.

विजय देवरकोंडा अखेरचा गौतम तिन्नानुरी यांच्या ‘किंगडम’ (Kingdom) या चित्रपटात दिसला होता. आता तो दिग्दर्शक राहुल संकृत्यान यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा – Trump India Visit : ट्रम्प लवकरच भारतात येणार? स्वतः माहिती देत म्हणाले…

Web Title:
संबंधित बातम्या