V60e 5G Launched : नवीन फोने म्हटलं कि सगळ्यांमध्येच उत्साहाचे वातावरण असते. पण स्मार्ट म्हटलं कि सर्वसामान्यना पहिले आठवत ते बजेट. त्यामुळे स्वतःच्या बजेट मध्ये स्वस्त फोनेच्या ते शोधात असतात. एकदा का बजेट ठरलं कि आपण त्या फोनची कॅमेरा कॅलिटी त्या फोनची बॅटरी हे सगळे पाहत असतो . तर तुम्हालाही ३० हजाराहून कमी किंमतीत एखादा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी.
Vivo कंपनी कायमच नव नवीन फोन लॉन्च करत असते. त्यामुळे आता Vivo च्या कंपनीने V60e 5Gहा नवा कोरा फोन लाँच करणार आहे. कंपनीच्या मते, Vivo V60e हा भारतातील पहिला एकमेव फोन आहे जो AI फेस्टिव्हल पोर्ट्रेट, एआय फोर सीझन पोर्ट्रेट आणि इमेज एक्सपेंडर फीचर्सने सुसज्ज आहे ; जो खरेदीदारांना अगदी सहज आकर्षित करू शकतो. Vivo V60e 5G ची डिझाइन याआधी लाँच झालेल्या Vivo V60 मॉडेलसारखीच असणार आहे. यात दोन कॅमेरा लेन्स दिले आहे. स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जणार आहे.
याशिवाय, Vivo V60e धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर ६.७७ इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील मिळणार आहे; जो 120Hz रिफ्रेश रेट, FHD प्लस रिझोल्यूशन आणि डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शनसहित देण्यात आले आहे.
य स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देखील असेल; ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 200MP चा मेन कॅमेरा आणि 30x सुपरझूम देखील करता येणार आहे. यामध्ये 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा, ऑटो फोकससह 50MP चा सेल्फी कॅमेरा, एआय फेस्टिव्हल पोर्ट्रेट, एआय फोर-सीझन पोर्ट्रेट, एआय इमेज एक्सपेंडर यासारखे कॅमेरा फीचर्स देखील तुम्हाला या फोन मध्ये मिळू शकतात.
स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी मिळणार असून ; जो 90W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोन 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी २८,७४९ या सुरुवातीच्या किमतीत हा फोन लाँच केला जाणार असल्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –









