Home Remedies : हिवाळ्यात सर्दी खोकला होणे सामान्य. पण बऱ्याचदा जेव्हा लहान मुलांना सर्दी खोकला येतो तेव्हा घरच्या घरी काय पटकन आणि मूलभूत उपाय करावे हेच समजत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सुचवलेले काही प्रभावी उपाय आहेत. हिवाळ्यातील थंडी जसजशी वाढते, तसतसे लहान मुलांना सर्दी-खोकल्याचे त्रास सुरु होऊ लागतात. कधी कधी खोकला इतका जास्त होतो की मुलं रात्री झोपही घेऊ शकत नाहीत, आणि त्याचवेळी पालक मात्र प्रचंड चिंतेत पडतात की औषधांशिवाय मुलाला कसा लवकर आराम मिळेल. डॉक्टर सांगतात की मुलांची रोगप्रतिकारक शक्ती जसं जसं ते मोठे होतात तस तशी त्यांची रोगप्रतिकारक शकरी अजून विकसित होत असते, त्यामुळे ते हवामानातील बदलांना अधिक लवकर बळी पडतात. पण या सगळ्यावर डॉक्टर प्रभावी घरगुती उपाय देखील सांगतात. ते घरगुती उपाय पुढीलप्रमाणे
सर्दी किंवा कफ झालेल्या लहान किंवा मोठ्यांसाठी खरं तर वाफ घेणं हा सर्वात सोपा आणि परिणामकारक असा प्रभावी उपाय आहे. लहान मुलांसाठी एका टब मध्ये गरम पाणी भरा तुमच्या गरजेनुसार आणि लहान मुलांना त्याची वाफ द्या..आणि मोठ्यांना एका पातेल्यात गरजेनुसार गरम पाणी द्या आणि डोक्यावरून चादर घेऊन वाफ घायला सांगा.. यामुळे जास्त फरक जाणवेल.
याशिवाय हळदीत असलेला ‘कर्क्युमिन’ हा घटक खोकला-कफ कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करतो. एक कप दूध उकळून त्यात तुमच्या आवश्यकते नुसार हळद घालून काही मिनिटे उकळवा. नंतर थोडं थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध मिसळा.ह्या पेयामुळे घसा मऊ ठेवते, सर्दी कमी करते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढवते. हॆ झोपण्याच्या आधी दिल्यास यामुळे अधिक चांगली झोप लागते.
जर मूल एका वर्षापेक्षा मोठं असेल तर त्याला झोपण्यापूर्वी एक चमचा शुद्ध मध नुसत खायला द्या. अनेक संशोधनांत सिद्ध झालं आहे की मध गळा मऊ ठेवतो, खोकल्याची वारंवारता कमी करतो आणि रात्री यामुळे झोप देखील चांगली लागते.
हे देखील वाचा –
(टीप : वरील माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी.)









