Vicky Kaushal and Katrina Kaif : बॉलिवूड मधील बहुचर्चित जोडी विकी आणि कतरिना यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना मुलगा झाला असून नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या या छोट्या पाहुण्यामुळे त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचा संचार झाला आहे. कतरिनाने स्वतः ही आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. Blessed ॐ असे लिहात त्यांनी ही पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला आहे..
कतरिना आणि विकी कौशलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “गॉड ब्लेस द लिटिल वन”, “लिटल विक-कॅट” आणि “नोव्हेंबर बेबी स्टार” अशा गोंडस कमेंट्सने त्यांच्या पोस्टचा कमेंट सेक्शन भरून गेला आहे.
हे देखील वाचा –









