Home / News / T20 World Cup 2026 Final in Ahmedabad : टी २० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमध्ये!देशातील ५ शहरांत सामने

T20 World Cup 2026 Final in Ahmedabad : टी २० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमध्ये!देशातील ५ शहरांत सामने

T20 World Cup 2026 Final in Ahmedabad – भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांत संयुक्तपणे होणारी टी २० विश्वचषक २०२६...

By: Team Navakal
T20 World Cup 2026 Final in Ahmedabad
Social + WhatsApp CTA

T20 World Cup 2026 Final in Ahmedabad – भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांत संयुक्तपणे होणारी टी २० विश्वचषक २०२६ ही स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार आहे.या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही,परंतु बीसीसीआयने टी विश्वचषक सामन्यांचे आयोजन करण्यासाठी पाच शहरांची निवड केली आहे.

यामध्ये अहमदाबाद,दिल्ली, कोलकाता,चेन्नई आणि मुंबई यांचा समावेश आहे.अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

याआधी २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता,जिथे ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते.नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्याची आसन क्षमता २ लाखाहून अधिक आहे.

२०२३ चा एकदिवसीय विश्वचषक दहा ठिकाणी खेळवण्यात आला होता.बीसीसीआयच्या मते,यावेळी विश्वचषकाचे सामने फक्त ५ उच्च दर्जाच्या ठिकाणी खेळवले जातील, जेणेकरून व्यवस्थापन आणि सुरक्षेची पातळी सर्वोत्तम राहील. आयसीसी पुढील आठवड्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या २०२५ च्या टी २० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते.

या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेतही खेळवले जातील, कारण पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. भारतासोबतच्या करारामुळे पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळेल.श्रीलंका पाकिस्तानसाठी तटस्थ स्थळ म्हणून काम करेल.

या स्पर्धेत जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर विजेतेपदाचा सामना श्रीलंकेत खेळला जाईल.यजमान देश कोणताही असो, आयसीसी, बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील करारानुसार, भारत आणि पाकिस्तान २०२७ पर्यंत त्यांचे सर्व सामने तटस्थ स्थळांवर खेळतील. सामने श्रीलंकेत कोलंबोसह तीन ठिकाणी आयोजित केले जातील.

भारताने जून २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये टी२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. त्यामुळे भारत २०२६ च्या विश्वचषकात गतविजेता म्हणून उतरणार आहे. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरेल.


हे देखील वाचा –

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना पुत्र प्राप्ती..

V60e 5G Launched : Vivo चा नवीन स्मार्टफोन होणार लवकरच लॉन्च; ३० हजाराहून कमी किमतीत मिळणार हा स्मार्ट फोन

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या