Home / लेख / सर्वोत्तम गेमिंग फोन शोधताय? Realme च्या ‘या’ Smartphone ची किंमत झाली 15 हजारांनी कमी; ऑफर एकदा पाहाच

सर्वोत्तम गेमिंग फोन शोधताय? Realme च्या ‘या’ Smartphone ची किंमत झाली 15 हजारांनी कमी; ऑफर एकदा पाहाच

Realme GT 7 Pro Price Cut : जर तुम्ही उत्कृष्ट क्षमतेचा फ्लॅगशिप स्मार्टफोन (Flagship Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल,...

By: Team Navakal
Realme GT 7 Pro Price Cut
Social + WhatsApp CTA

Realme GT 7 Pro Price Cut : जर तुम्ही उत्कृष्ट क्षमतेचा फ्लॅगशिप स्मार्टफोन (Flagship Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Realme GT 8 Pro च्या लॉन्चिंगपूर्वीच Flipkart ने Realme GT 7 Pro या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

आधी याची किंमत 59,999 रुपये होती, पण आता थेट डिस्काउंटनंतर हा फोन अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाला आहे.

Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन आता सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनपैकी एक बनला आहे. 6,500 nits ची पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंगसारख्या फीचर्ससह येणारा हा फोन, जास्त खर्च न करता हाय-एंड गेमिंगसाठी सर्वोत्तम डील ठरू शकतो.

Realme GT 7 Pro वर विशेष ऑफर

Realme GT 7 Pro चे 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेले ‘मार्स ऑरेंज’ (Mars Orange) मॉडेलवर थेट 15,501 रुपयांची मोठी सूट देण्यात आली आहे. यामुळे हा फोन आता Flipkart वर केवळ 44,498 रुपयांना उपलब्ध आहे.

यासोबतच, ग्राहकांना बँक ऑफर्सचा फायदा घेता येईल. तसेच, Flipkart जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 33,300 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू देखील देत आहे, जी जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Realme GT 7 Pro चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि बॅटरी: यात 6.78 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate), HDR10+, Dolby Vision सपोर्ट आणि 6,500 nits पीक ब्राइटनेससह येतो. तसेच, फोनमध्ये 5,800 mAh ची बॅटरी असून, ती 120 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट (Chipset) देण्यात आला आहे.

कॅमेरा फीचर्स: फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 MP चा मुख्य सेन्सर, 50 MP चा टेलीफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) आणि 8 MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16 MP चा कॅमेरा उपलब्ध आहे.

हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठीच्या E-KYC ची मुदत वाढणार? शेवटची तारीख काय? त्वरित पूर्ण करा प्रोसेस

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या