Pankaja Munde VS Suresh Dhas : स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीची मंगळवारी घोषणा करण्यात आली. आणि महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. आरोप प्रत्यारोपांच्या मालिकांना सुरवात झाली. यामध्ये स्थानिक पातळीवरील महायुतीतील वाद कोणापासूनच लपलेले नाही. पण हे स्थानिक पाळीवरच मर्यादित नाही आहे. हे बड्या नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळत. आणि याच पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली. यात एकमेकांवर कडाडून टीका करणाऱ्या पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांना एकत्र बांधण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे प्रमूख म्हणून सुरेश धस आणि प्रभारी म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती केली आहे. बऱ्याचदा हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसतात. एकमेकांवर टीका करायची ते एकही संधी सोडत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या नेत्यांनी बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्यासाठीची सगळी जवाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. भाजपचा मुंडे- धस यांच्यातील हा वाद संपण्याचा केलेला प्रयत्न सुरु आहे.
या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांमध्ये आपापसात कसोटी चांगलीच रंगताना दिसत आहे. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकत्र येऊन सामंजस्याने हा प्रश्न सोडवणार कि पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा पवित्रा हाती घेत स्वतःसोबत पक्षाचे नुकसान करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –सर्वोत्तम गेमिंग फोन शोधताय? Realme च्या ‘या’ Smartphone ची किंमत झाली 15 हजारांनी कमी; ऑफर एकदा पाहाच









