Home / महाराष्ट्र / Land Scam Allegation : राज्यात जमीन घोटाळ्यांची मालिका? पार्थ पवारांनंतर आता सरकारमधील मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Land Scam Allegation : राज्यात जमीन घोटाळ्यांची मालिका? पार्थ पवारांनंतर आता सरकारमधील मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Pratap Sarnaik Land Scam Allegation : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांतील नेत्यांवर जमीन लाटल्याचे आरोप होत असल्याने वातावरण...

By: Team Navakal
Land Scam Allegation
Social + WhatsApp CTA

Pratap Sarnaik Land Scam Allegation : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांतील नेत्यांवर जमीन लाटल्याचे आरोप होत असल्याने वातावरण तापले आहे. पुणे येथील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर आरोप झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावरही पुण्यातील 1800 कोटी रुपयांची महार वतनाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप झाला होता.

आता काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर थेट गंभीर आरोप केला आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर नेमका काय आरोप?

आमदार विजय वडेट्टीवार यांनी एका व्हिडिओद्वारे आरोप करताना म्हटले आहे की, मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर (Mira-Bhayander) परिसरात एक मोक्याची 4 एकर जमीन केवळ 3 कोटी रुपयांना विकत घेतली. वडेट्टीवार यांचा दावा आहे की, या जमिनीचे बाजारमूल्य अंदाजे 200 कोटी ते 400 कोटी रुपये आहे.

सरनाईक यांनी ही जमीन त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी घेतल्याचे बोलले जात आहे. “मंत्र्यांना त्यांच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावावर इतक्या कमी किमतीत अशी जागा घेता येते का?” असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी “तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो,” अशा शब्दांत सरनाईक आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

वडेट्टीवार यांनी या जमीन घोटाळ्याची सविस्तर माहिती लवकरच उघड करणार असल्याचेही सांगितले आहे.

पार्थ पवार प्रकरणावरही टीकास्त्र

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्या पुणे जमीन प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात जमिनीशी संबंधित प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यांची मालिका सुरू झाली आहे. यामध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घोटाळ्यांचा समावेश आहे. बिल्डर, डेव्हलपर आणि राजकारण्यांनी जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे.

पार्थ पवार प्रकरणातील करार रद्द झाला असला आणि काही लोकांवर गुन्हे दाखल झाले असले तरी, वडेट्टीवार यांनी मागणी केली की, कंपनीचा जो मूळ मालक आहे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तसेच, या व्यवहारात मुद्रांक शुल्कात सूट देणारे महसूल विभागाचे अधिकारी आणि चुकीचे रजिस्ट्रेशन करणारे सब-रजिस्ट्रार या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठीच्या E-KYC ची मुदत वाढणार? शेवटची तारीख काय? त्वरित पूर्ण करा प्रोसेस

Web Title:
संबंधित बातम्या