Vande Bharat : सध्या देशाच्या विविध भागात सुरू असलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ही भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहे,असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काढले. मोदींनी आज वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.त्याप्रसंगी ते बोलत होते.
Delighted to flag off four Vande Bharat trains. These will enhance connectivity and provide greater comfort for citizens.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2025
https://t.co/kHl2ufYLoF
याप्रसंगी मोदी म्हणाले की, आजच्या वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत (Amrit Bharat) सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहे.वंदे भारत ही भारतीयांनी भारतीयांसाठी बांधलेली रेल्वेगाडी आहे . त्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे. ही विकसित पायाभूत सुविधा कोणत्याही देशाच्या लक्षणीय विकासामागील प्रेरक शक्ती असते. देशाच्या रेल वाहतुकीमध्ये वेग, आराम आणि आधुनिकतेचे प्रतीक बनलेल्या या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आता प्रवाशांसाठी प्रवास अधिक आरामदायी बनवतील. या चार नवीन गाड्यांसह, देशात वंदे भारत एक्सप्रेसची एकूण संख्या १६४ झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या गाड्यांमध्ये वाराणसी-खजुराहो (Varanasi–Khajuraho), लखनऊ-सहारापूर, फिरोजपूर (Firozpur)-नवी दिल्ली (New Delhi) आणि एर्नाकुलम- बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा –
वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण! मोदींनी गायला वगळलेला भाग
‘एशियाटिक’साठी आज मतदान !धर्मादायचा आदेश हायकोर्टात रद्द
सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती









