NCP Rupali VS Rupali : फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde)आत्महत्येच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakanakar)आणि प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre-Patil) यांच्यात वाद पेटला आहे.
चाकणकर यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका केल्यामुळे, शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस पक्षाने ठोंबरे यांना पाठवली. ही नोटीस मिळाल्यानंतर रूपाली ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची पुण्यात भेट घेतली.
https://www.facebook.com/share/p/1JsGcmb8H8
या भेटीनंतर रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, मला पक्षाने शिस्तभंगाची नोटीस (disciplinary notice)पाठवली नाही. मी महिला आयोगाच्या अध्यक्षा (Women’s Commission Chairperson) आणि प्रदेश अध्यक्षा यांच्या संदर्भात माध्यमांवर जे वक्तव्य केले, त्याबाबत पक्षाने माझ्याकडे खुलासा मागितला आहे. मला ७ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. ते दिल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा माहिती देणार आहे. मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे. पक्ष आणि आयोग वेगळा आहे. या आधी एका मुलीने माझ्या विरोधात पोस्ट केली होती, ती मुलगीदेखील चाकणकर यांचीच होती. स्नेहल चव्हाण असे त्या मुलीचे नाव आहे. हे सगळे पुरावे सुनील तटकरे आणि अजित पवार यांना दिले आहेत.
हे देखील वाचा –
२०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला
वंदे भारत ‘कडून रेल्वेच्याभावी पिढीची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार









