Mumbai mahapalika- मुंबई महापालिकेच्या (Mumbai mahapalika)निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपाने प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांची गार्हाणी ऐकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाण्याची सुरुवात केली आहे. शनिवार-रविवार असे सुट्टीचे दिवस पाहून मतदारांना गाठण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष मोहीम आखली आहे.
महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेले भाजपाचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. शिंदे शिवसेना, उबाठा किंवा मनसे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याआधी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर-मध्य मुंबई जिल्हा सचिव रुपेश मालुसरे यांनी खार पूर्व भागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची गार्हाणी ऐकण्यास सुरुवात केली आहे. योग्य व तत्काळ कारवाई व्हावी, अशा मतदारांच्या तक्रारी व सूचनांचे संकलन सुरू आहे. या सूचनांच्या माध्यमातून भाजपाचा पालिका अजेंडाही ठरवला जाणार आहे. 3 वर्षांपासून पालिका निवडणूक रखडल्यामुळे मतदारांना नगरसेवकापेक्षा आमदारच अधिक महत्त्वाचा झाला. नगरसेवक नसल्याने आमदारांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आमदाराची मतदारसंघात असलेली पकड डोईजड होऊ लागल्याचे भाजपाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.
हे देखील वाचा –
२०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला
वंदे भारत ‘कडून रेल्वेच्याभावी पिढीची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार









