Home / arthmitra / Digital Gold : 10 रुपयांत ‘डिजीटल गोल्ड’ खरेदी करताय? गुंतवणूकदारांना सेबीचा महत्त्वाचा इशारा

Digital Gold : 10 रुपयांत ‘डिजीटल गोल्ड’ खरेदी करताय? गुंतवणूकदारांना सेबीचा महत्त्वाचा इशारा

Digital Gold Warning : आजच्या डिजिटल युगात सोने खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स केवळ 10...

By: Team Navakal
Digital Gold
Social + WhatsApp CTA

Digital Gold Warning : आजच्या डिजिटल युगात सोने खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स केवळ 10 रुपयांपासून सुरुवात करून डिजिटल गोल्ड (Digital Gold) मध्ये गुंतवणूक करण्याची आकर्षक संधी देत आहेत. मात्र, या सुविधांच्या बाजूला मोठी जोखीम (Risk) दडलेली आहे.

बाजार नियामक ‘सेबी’ने (SEBI) गुंतवणूकदारांना अशा डिजिटल गोल्ड उत्पादनांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे, कारण हे प्लॅटफॉर्म्स कोणत्याही सरकारी नियमांच्या अधीन नाहीत.

निवेदनात सेबीने स्पष्ट केले आहे की, विविध ऑनलाइन माध्यमांतून ऑफर केले जाणारे ‘डिजिटल गोल्ड’ किंवा ‘ई-गोल्ड’ (E-Gold) उत्पादने ही भांडवली बाजार नियमांतर्गत नियंत्रित केलेली नाहीत.

सेबीने सांगितले की, हे डिजिटल गोल्ड उत्पादने सेबीने नियंत्रित केलेल्या सोन्याच्या उत्पादनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ही उत्पादने सेबीच्या अधिकार क्षेत्राबाहेर चालतात आणि यामुळे गुंतवणूकदारांना प्रतिपक्षाचे तसेच कामकाज चालवण्यातील मोठे धोके निर्माण होऊ शकतात.

सेबीने गुंतवणूकदारांना महत्त्वाचा इशारा दिला आहे की, भांडवली बाजारांतर्गत उपलब्ध असलेल्या गुंतवणूकदार संरक्षण यंत्रणांपैकी कोणतीही यंत्रणा डिजिटल गोल्डमध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणार नाही.

या कंपन्या देतात डिजिटल गोल्ड

सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने अनेक नामांकित ऑनलाइन कंपन्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहेत. यात Tanishq, MMTC PAMP, Aditya Birla Capital, Caratlane, Jos Alukkas, PhonePe आणि Shriram Finance सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

या कंपन्या कितीही विश्वासार्ह असल्या तरी, जर भविष्यात आर्थिक व्यवहारात काही चूक झाली, तर गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील नियमांनुसार कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असे सेबीने स्पष्ट केले आहे.

सेबी-नियंत्रित गुंतवणुकीचे पर्याय

गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मिळावेत यासाठी सेबीने काही सोन्याशी संबंधित उत्पादनांना मान्यता दिली आहे, जी नियमांनुसार चालतात. यात एक्स्चेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स (Exchange-Traded Commodity Derivative Contracts), म्युच्युअल फंड्सद्वारे ऑफर केलेले गोल्ड ETFs (Exchange Traded Funds) आणि स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करता येणारे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (EGRs) यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा – विश्वचषक विजेत्या’ या’ 22 वर्षीय महिला क्रिकेपटूची थेट DSP पदावर नियुक्ती; सरकारने केले सन्मानित

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या