Indian-origin US Politicians : अमेरिकेच्या (USA) राजकारणात भारतीय वंशाच्या (Indian-origin) नेत्यांचा ठसा अधिकाधिक प्रभावीपणे उमटत आहे. अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी (Zohran Mamdani) निवडून आले आहेत.
दिग्दर्शिका मीरा नायर आणि शिक्षणतज्ज्ञ महमूद ममदानी यांचे पुत्र असलेले 34 वर्षीय झोह्रान ममदानी यांनी या विजयासह अमेरिकेतील भारतीय राजकारण्यांच्या यशाच्या मालिकेत आणखी एका मोठ्या नावाची भर घातली आहे.
ममदानी यांनी माजी सिनेटर कुओमो यांना मागे टाकून 50 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवला. 1969 नंतर न्यूयॉर्कमध्ये यावेळी सर्वाधिक मतदान झाले.
ममदानी यांच्याशिवायअमेरिकेत अनेक महत्त्वपूर्ण पदांवर भारतीय वंशाचे नेते यशस्वी होत आहेत. विविध सरकारी स्तरांवर सुमारे 50 हून अधिक भारतीय वंशाचे लोक कार्यरत आहे.
निवडणुकीतील प्रमुख भारतीय चेहरे:
गझाला हाश्मी (Ghazala Hashmi) – व्हर्जिनिया: भारतीय वंशाच्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या गझाला हाश्मी (वय 61) यांची व्हर्जिनियाच्या उपराज्यपालपदी निवड झाली आहे. व्हर्जिनिया सिनेटमध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महिला ठरल्या आहेत. हैदराबादमध्ये जन्मलेल्या हाश्मी यांनी 54.2 टक्के मते मिळवून रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा पराभव केला.
आफताब पुरेवाल (Aftab Pureval) – सिनसिनाटी: आफताब पुरेवाल (वय 43) यांची सिनसिनाटीचे महापौर म्हणून पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत 80 टक्के मते मिळवली होती. 2021 मध्ये ते आशियाई-अमेरिकन आणि भारतीय-तिबेटी वंशाचे पहिले महापौर बनले होते.
इतर नेते: नॉर्थ कॅरोलिनामध्ये सतीश गारिमेला (Satish Garimella) आणि न्यू जर्सीमध्ये दिनी अजमानी (Dini Ajmani) महापौरपदासाठी शर्यतीत होते.
‘समोसा कॉकस’ आणि प्रभाव:
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात (US House of Representatives) सध्या 7 भारतीय-अमेरिकन नेते कार्यरत आहेत, ज्यांना अनौपचारिकपणे ‘समोसा कॉकस’ म्हणून ओळखले जाते. कमला हॅरिस या उपराष्ट्रपती आहेत, तसेच रिपब्लिकन पक्षात बॉबी जिंदाल आणि विवेक रामास्वामी यांनी मोठे राजकीय स्थान मिळवले आहे. 2013 पासून 2025 पर्यंत भारतीय-अमेरिकन लोकांची राज्य विधिमंडळातील संख्या 10 वरून 50 पर्यंत वाढली आहे.
हे देखील वाचा – विश्वचषक विजेत्या’ या’ 22 वर्षीय महिला क्रिकेपटूची थेट DSP पदावर नियुक्ती; सरकारने केले सन्मानित









