Home / लेख / Power Bank Safety : पॉवर बँक वापरताना सावध राहा! आग लागण्यापासून वाचवण्यासाठी ‘हे’ 5 नियम पाळा

Power Bank Safety : पॉवर बँक वापरताना सावध राहा! आग लागण्यापासून वाचवण्यासाठी ‘हे’ 5 नियम पाळा

Power Bank Safety : प्रवासात किंवा आपत्कालीन परिस्थितीत फोनची बॅटरी संपल्यास पॉवर बँक (Power Bank) आपल्यासाठी एक उपयोगी ठरतो. मात्र,...

By: Team Navakal
Power Bank Safety
Social + WhatsApp CTA

Power Bank Safety : प्रवासात किंवा आपत्कालीन परिस्थितीत फोनची बॅटरी संपल्यास पॉवर बँक (Power Bank) आपल्यासाठी एक उपयोगी ठरतो. मात्र, याच पॉवर बँकांमध्ये आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

नुकताच मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Melbourne International Airport) एका प्रवाशाच्या खिशात ठेवलेल्या लिथियम पॉवर बँकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या स्फोटामुळे सुमारे 150 हून अधिक लोकांना तात्काळ सुरक्षितस्थळी हलवावे लागले, तर या व्यक्तीला भाजल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.

पॉवर बँक धोकादायक का ठरते?

पॉवर बँक वापरत नसतानाही त्याला आग लागण्याचा धोका असतो. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. अति चार्जिंग (Overcharging): पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावरही ती प्लगमध्ये तशीच ठेवल्यास, बॅटरीचे तापमान वाढते, ज्यामुळे अति उष्णता निर्माण होऊन आग लागण्याची शक्यता वाढते. रात्री झोपताना किंवा लक्ष नसताना चार्जिंग करणे टाळावे.
  2. शॉर्ट सर्किट (Short Circuit): बॅटरीचे अंतर्गत भाग खराब झाल्यास किंवा धातूच्या वस्तूंशी (उदा. नाणी, चाव्या) संपर्क आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. यामुळे बॅटरीमध्ये अनियंत्रित उष्णता वाढू लागते.
  3. बॅटरीचे नुकसान: पॉवर बँक खाली पडणे, तिला टोचणे किंवा तिच्यावर दाब पडल्यास आतील बॅटरी खराब होते. यांत्रिक ताण आल्यास आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे खराब झालेली पॉवर बँक त्वरित बदलणे आवश्यक आहे.
  4. अयोग्य साठवणूक: पॉवर बँक जास्त गरम किंवा दमट ठिकाणी ठेवल्यास बॅटरीचे सेल खराब होतात. यामुळे उष्णता वाढून आग लागण्याचा धोका वाढतो.
  5. निम्न-गुणवत्ता: स्वस्त आणि कमी दर्जाच्या पॉवर बँकांमध्ये सुरक्षितता यंत्रणा पुरेशी नसते. यात ओव्हरचार्ज संरक्षण किंवा तापमान नियंत्रणाची सुविधा नसल्यामुळे धोका अधिक असतो.

पॉवर बँक खराब झाल्याची चिन्हे:

तुमची पॉवर बँक धोकादायक बनण्यापूर्वी काही संकेत देते. याकडे लक्ष द्या:

  • आकार बदलणे: पॉवर बँक फुगणे, सूज येणे किंवा तिचा आकार बदलणे.
  • असामान्य वास: जळाल्याचा किंवा कोणत्याही रसायनाचा वास येणे.
  • विचित्र आवाज: पॉवर बँकमधून गुंजन किंवा ‘पॉपिंग’ सारखे आवाज येणे.

आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय:

  • खराब असल्यास त्वरित बदला: पॉवर बँक खराब झाला असल्यास, त्याची कार्यक्षमता कमी झाली असल्यास किंवा पडला असल्यास ती लगेच बदलून टाका.
  • उत्तम दर्जाचा ब्रँड निवडा: नेहमी प्रतिष्ठित कंपनीच्या आणि सुरक्षा चाचणी (Safety Tested) केलेल्या पॉवर बँका वापरा. बनावट किंवा स्वस्त उत्पादने टाळा.
  • सुरक्षित चार्जिंगचे पालन: पॉवर बँक चार्जिंग करताना नजरेसमोर ठेवा. थंड, कोरड्या जागी चार्ज करा आणि चार्ज पूर्ण होताच प्लग काढा.
  • थेट सूर्यप्रकाश टाळा: पॉवर बँक थेट सूर्यप्रकाश आणि धूळ (Dust) यापासून दूर ठेवा.
  • संरक्षणासाठी वेगळी पिशवी: शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी पॉवर बँक नेहमी चाव्या किंवा नाण्यांसारख्या धातूच्या वस्तूंपासून वेगळ्या, लहान पिशवीत ठेवा.

हे देखील वाचा – Narco Test : मनोज जरांगे हत्येचा कट, धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर ‘नार्को टेस्ट’ची चर्चा; जाणून घ्या ही चाचणी कशी केली जाते?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या