Home / लेख / Tata Harrier EV वर तब्बल 1 लाखाची सवलत! 600 किमी रेंजसह 5 स्टार सुरक्षा; पाहा डिटेल्स

Tata Harrier EV वर तब्बल 1 लाखाची सवलत! 600 किमी रेंजसह 5 स्टार सुरक्षा; पाहा डिटेल्स

Tata Harrier EV Discount : टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यातील सर्वात पॉवरफुल आणि बहुचर्चित मॉडेल हॅरियर EV (Harrier EV) खरेदी...

By: Team Navakal
Tata Harrier EV
Social + WhatsApp CTA

Tata Harrier EV Discount : टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यातील सर्वात पॉवरफुल आणि बहुचर्चित मॉडेल हॅरियर EV (Harrier EV) खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. कंपनी या नोव्हेंबर महिन्यात या एसयूव्हीच्या (SUV) सर्व व्हेरिएंट्सवर 1 लाख रुपयांची मोठी सवलत देत आहे.

या सवलतीनंतर, हॅरियर EV ची एक्स-शोरूम किंमत 21.49 लाख रुपयांवरून कमी होऊन 20.49 लाख रुपये झाली आहे.

हॅरियर EV ही केवळ एक आकर्षक इलेक्ट्रिक कार नाही, तर 600 किलोमीटरपर्यंतची जबरदस्त रेंज आणि 5 स्टार सुरक्षा रेटिंगमुळे (Safety Rating) ती बाजारात वेगळी ठरते.

हॅरियर EV ची ‘ताकद’ आणि ‘सुरक्षा’:

  • ड्युअल मोटर AWD: सेगमेंटमध्ये हॅरियर EV ही ड्युअल मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) सेटअपसह येणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. प्रत्येक ॲक्सलवर एक इलेक्ट्रिक मोटर बसवल्यामुळे ही कार अत्यंत शक्तिशाली बनते. ‘बूस्ट मोड’ वापरून ही एसयूव्ही केवळ 6.3 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते.
  • उत्कृष्ट सुरक्षा: या मॉडेलला भारत NCAP (BNCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
  • ADAC आणि 6 टेरेन मोड: यात लेव्हल 2 ADAS (Advanced Driver Assistance System) सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात एकूण 6 मल्टी-टेरेन मोड्स आहेत, ज्यात ‘नॉर्मल’, ‘मड रट्स’, ‘रॉक क्रॉल’ आणि ‘सँड’ मोडचा समावेश आहे. यामुळे कठीण भूभागावरही उत्तम नियंत्रण मिळते.

प्रगत तंत्रज्ञान:

  • 540-डिग्री कॅमेरा: या एसयूव्हीमध्ये 360-डिग्री सराउंड व्ह्यू मॉनिटर सिस्टीमसह एक अतिरिक्त 540-डिग्री कॅमेरा फंक्शन आहे. ‘ट्रान्सपरंट मोड’ वापरल्यास चालकाला कारच्या खाली काय आहे, हे स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे खडकाळ रस्ते पार करणे सोपे होते.
  • मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले: 14.5 इंचाचा नवा आणि सर्वात मोठा नियो क्यूएलईडी डिस्प्लेयात आहे, जो उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभव देतो.
  • डिजिटल IRVM: शार्क फिन ॲन्टेनामध्ये बसवलेला अतिरिक्त कॅमेरा डिजिटल IRVM वर मागील भागाचे स्पष्ट चित्र दाखवतो. यामुळे सुरक्षितता (Safety) वाढते आणि डॅशकॅमचे कामही होते.

हे देखील वाचा – Narco Test : मनोज जरांगे हत्येचा कट, धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर ‘नार्को टेस्ट’ची चर्चा; जाणून घ्या ही चाचणी कशी केली जाते?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या