Home / महाराष्ट्र / Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेमुळे हाहाकार; AQI 400 च्या घरात, नागरिक उतरले रस्त्यावर

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेमुळे हाहाकार; AQI 400 च्या घरात, नागरिक उतरले रस्त्यावर

Delhi Air Pollution : दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. याच पार्श्वभूमीवर, इंडिया गेट (India Gate) येथे...

By: Team Navakal
Delhi Air Pollution
Social + WhatsApp CTA

Delhi Air Pollution : दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. याच पार्श्वभूमीवर, इंडिया गेट (India Gate) येथे मोठ्या संख्येने पालक, महिला आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. राजधानीतील नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी, यासाठी सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे.

मुलांच्या भविष्याची चिंता

अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका पर्यावरण कार्यकर्त्याने सांगितले की, “आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटू इच्छितो. मुलांचे फुफ्फुस खराब होत असल्याने पालक चिंतेत आहेत. अभ्यास दर्शवतो की, स्वच्छ हवेत न वाढणाऱ्या दिल्लीतील मुलांना सामान्य नागरिकांपेक्षा सुमारे 10 वर्षे आयुष्य कमी जगावे लागेल.”

या दिवशी दिल्लीत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक होती. ‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’च्या आकडेवारीनुसार, सकाळच्या वेळी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 392 नोंदवला गेला, तर अनेक भागांमध्ये तो 400 च्या पुढे गेला होता. यामुळे दिल्लीचा समावेश देशातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये झाला.

पोलिसांची कारवाई

पोलिसांनी सांगितले की, इंडिया गेट येथे आंदोलनाची कोणतीही परवानगी नव्हती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सुरक्षा व्यवस्थेत अडथळा येऊ नये यासाठी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. न

आम आदमी पक्षाचा पाठिंबा आणि टीका

विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने (AAP) या आंदोलनाला समर्थन दिले आहे. आप नेत्या प्रियांका कक्कर यांनी दिल्लीतील भाजप सरकारवर टीका करताना म्हटले की, “राजधानीतील सरकार प्रदूषणाची समस्या स्वीकारत नाहीये, यामुळे दिल्लीतील जनता संतप्त आहे. त्यांनी डेटाची फेरफार न करता, लोकांशी जोडून घ्यायला हवे.”

आपचे दिल्ली प्रमुख सौरभ भारद्वाज यांनी हे आंदोलन ‘अराजकीय’ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “प्रदूषणासारख्या गंभीर विषयावर अराजकीय आंदोलन झाले, याचा आम्हाला आनंद आहे. अनेक सुजाण लोक यात सहभागी झाले आहेत.” सरकारी संस्था CPCB, CAQM आणि IMD डेटा चुकीचा दाखवत असल्यामुळे लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला आहे आणि म्हणूनच बुद्धिजीवी वर्ग आज रस्त्यावर उतरला आहे, असा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला.

हे देखील वाचा – Mohan Bhagwat : ‘मुस्लिम-ख्रिश्चन RSS मध्ये येऊ शकतात; पण…’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या