Sanju Samson CSK Trade: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील बहुप्रतिक्षित आयपीएल (IPL) ट्रेड चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे. रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात संंजू सॅमसनला CSK मध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी या डीलमध्ये एमएस धोनी यांची मध्यवर्ती भूमिका असल्याचे मत व्यक्त केले आहे. कैफ यांच्या मते, धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील हा शेवटचा महत्त्वाचा निर्णय असू शकतो.
भविष्याचा कर्णधार हवा
मोहम्मद कैफने त्यांच्या ‘यूट्यूब’ चॅनलवर सांगितले की, संंजू सॅमसनसारखा सक्षम विकेटकीपर आणि नेतृत्व पर्याय मिळवण्यासाठी धोनी यांनी जडेजासारख्या मॅच-विनर खेळाडूला सोडण्याचा धोका पत्करला आहे. कैफ यांना वाटते की, 2022 मध्ये जडेजाचे कर्णधार म्हणून अपयशी ठरलेले पर्व या निर्णयामागे प्रमुख कारण आहे. त्यावेळी चेन्नईने पहिल्या 8 पैकी फक्त 1 सामना जिंकला आणि संघाला तळाशी गेल्यामुळे धोनींना पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास भाग पाडले गेले होते.
धोनीचा अंतिम प्लॅन
कैफ म्हणाला की, “जर हा ट्रेड यशस्वी झाला, तर हे धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल. कदाचित धोनीमध्येच नेतृत्व सोडण्याची शक्यताही आहे. संंजू संघात आल्यास तो व्यवस्थापन आणि धोनींसोबत जुळवून घेईल. अशा परिस्थितीत धोनी त्याला कर्णधारपद स्वीकारण्यास सांगू शकतात.”
कैफ पुढे म्हणाला की, “आम्ही अनेक वर्षांचा आमचा मॅच-विनर जडेजा सोडला, पण आम्हाला भविष्यातील कर्णधार हवा आहे. धोनी युगाच्या नंतर नेतृत्व सांभाळू शकणाऱ्या खेळाडूला आणण्यासाठी धोनी जडेजाचा त्याग करत आहेत.”
जडेजाची संमती
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जडेजाने राजस्थानमध्ये जाण्यास संमती देण्यापूर्वी धोनी सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली होती. “धोनी चर्चांमध्ये सहभागी होता, जेणेकरून जडेजाची बदली करण्याची इच्छा आहे की नाही हे तपासता येईल आणि जडेजा सहमत झाल्यावरच पुढील चर्चा पुढे सरकली.”, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
चेपॉकसाठी योग्य फलंदाज
कैफ यांना वाटते की, चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) मैदानावर फलंदाजीसाठी ऋषभ पंत किंवा केएल राहुल यांच्यापेक्षा संंजू सॅमसन अधिक योग्य ठरू शकतो. सॅमसन मधल्या फळीत येऊन फलंदाजीला मजबुती देऊ शकतो आणि मधल्या षटकांमध्ये सहजपणे षटकार मारू शकतो.
हे देखील वाचा – अवघ्या 10,499 रुपयांत Vivo चा 5G स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 44W चार्जिंग सपोर्टसह बजेटमध्ये धमाका









