RSS Song Sparks Vande Bharat Row – केरळमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘गणगीतम’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत गायल्यावरून राजकीय वाद उफाळून आला आहे.
केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी याची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.काँग्रेसने या घटनेची तीव्र निषेध केला असून शालेय विद्यार्थ्यांचा धार्मिक उद्देशाने वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.तर मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
एर्नाकुलम – बंगळुरु वंदे भारत एक्सप्रेसचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पध्दतीने उद्घाटन केले. त्यानंतर या गाडीत सरस्वती विद्यानिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणगीतमचे सामुहिक गायन केले. दक्षिण रेल्वे प्रशासनाने गणगीतम गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मुख्यमंत्री विजयन यांनी या घटनेचा निषेध केला.काँग्रेसने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली.तर शिक्षणमंत्री शिवनकुट्टी यांनी माहिती विभागाच्या संचालकांना या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
दुसरीकडे सरस्वती विद्यानिकेतनचे मुख्याध्यापकांनी गणगीतम गायनाचे समर्थन केले. हे राष्ट्रभक्तीपर गीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे गायन केल्यास आक्षेप घेण्याची गरज नाही,असे मुख्याध्यापक डिंटो के. पी यांनी सांगितले.
गणगीतमवरून वाद निर्माण होताच दक्षिण रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला.मात्र थोड्या वेळाने इंग्रजी भाषांतरासह व्हिडिओ पु्न्हा शेअर केला.
हे देखील वाचा –
सिंचन घोटाळ्याचे आरोपही खोटे ठरले ! आताही बिनबुडाचे आरोप! अजित पवार बिनधास्त









