Home / महाराष्ट्र / Accident Case : जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावर भीषण अपघात; या अपघातात १० जण जखमी तर; १ महिलेचा चिरडून मृत्यू..

Accident Case : जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावर भीषण अपघात; या अपघातात १० जण जखमी तर; १ महिलेचा चिरडून मृत्यू..

Accident Case : आज काल अपघातांच्या मालिकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर शिरून...

By: Team Navakal
Accident Case
Social + WhatsApp CTA

Accident Case : आज काल अपघातांच्या मालिकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर शिरून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जावळपास १० लोक जखमी झाले असून त्याच्यातील चार लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एका महिलेचा यात मृत्यू झाला आहे.

कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने उरण तालुक्याच्या बसावी गावातील वारकऱ्यांची दिंडी पंढपूरला जात होती. त्यावेळीच कामशेत येथे भैरवनाथ मंदिरात रात्री ते मुक्कामाला थांबले. सकाळच्या सुमारास या दिंडीने प्रस्थान केले आणि त्यावेळी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणार कंटेनर येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला. यामध्ये गंभीर अपघात झाला आहे.जवळपास १० लोक किरकोळ जखमी असून त्याच्यातील ४ लोक गंभीर जखमी असलायची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात एका महिलेचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालेला आहे. तसेच यामुळे नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच त्यांनी वारंवार नागरिकांना आणि वारकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. परंतु वारकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतल्याचे देखील दिसून येत आहे.


हे देखील वाचा –Delhi Pollution : दिल्लीत वाढतोय प्रदूषणाचा धोका..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या