Airtel Recharge Plan : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी एअरटेलने (Airtel) आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या यादीतून 189 रुपयांचा एक जुना प्लॅन काढून टाकला आहे. हा प्लॅन फक्त व्हॉइस कॉलिंग (Voice Calling) सुविधा देत होता. हा प्लॅन बंद केल्यामुळे आता ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवण्यासाठी किमान 199 रुपयांचा रिचार्ज करणे बंधनकारक झाले आहे.
या बदलातून एअरटेलने आता डेटा-केंद्रीत प्लॅनला अधिक महत्त्व देण्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या काळात भारतीय दूरसंचार बाजारपेठेत केवळ व्हॉइस कॉलिंग पुरवणारे प्लॅन फारसे पसंत केले जात नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अडचण
189 रुपयांचा प्लॅन खास करून ज्येष्ठ नागरिक किंवा इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केला होता. यात देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Unlimited Voice Calling) मिळत होती, पण डेटा नव्हता. आता हा प्लॅन नसल्यामुळे, ज्या ग्राहकांना फक्त कॉलिंगची गरज आहे, त्यांनाही आपला नंबर चालू ठेवण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
₹199 रिचार्ज प्लॅनचे तपशील
एअरटेलने जुन्या प्लॅनमध्ये बदल करून 189 रुपयांचा प्लॅन हटवला आहे आणि 199 रुपयांचा प्लॅन आता कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बनला आहे.
एअरटेलच्या या 199 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना खालील सुविधा मिळतात:
- व्हॉइस कॉलिंग: देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग.
- डेटा: संपूर्ण 28 दिवसांसाठी एकूण 2GB डेटा.
- एसएमएस (SMS): दररोज 100 एसएमएस.
- वैधता: या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
- इतर फायदे: ग्राहकांना या प्लॅनसोबत फ्री हॅलो ट्यून्स (Hello Tunes) आणि 1 वर्षासाठी Perplexity Pro AI टूलचे सदस्यत्व (Subscription) मिळेल.
- अतिरिक्त शुल्क: 2GB डेटा मर्यादा संपल्यानंतर प्रति MB 50 पैसे शुल्क आकारले जाईल.
या नव्या एंट्री लेव्हल प्लॅनमध्ये ग्राहकांना आता कॉलिंग, डेटा आणि एसएमएस अशा तिन्ही सेवांचा एकत्रित लाभ मिळू शकेल.









